Header Ads Widget

उद्योजक दिपक कांबळे यांच्या सोबत राजकीय विशेष संवाद


नरसी : दिलीप वाघमारे :-

देगलूर मतदारसंघातील रामपूर येथील यशस्वी उधोजक दिपक कांबळे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून ध्येयाचे शिखर अन् अजोड जिद्द बाळगून प्रगती मार्गाची उतुंग भरारी घेत तब्बल तेरा राज्यात आपल्या अँक्टिव्हपे मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड हे नाव लौकिक करत १८०० हुन अधिक बेरोजगारला रोजगार उपलब्ध करून दिले आहे

यांच्या सोबत दिलखुलास राजकीय संवाद साधतांना उधोजक दिपक कांबळे आमच्या प्रतिनिधीला बोलताना म्हणाले आहे 
   
एखाद्या क्षेञात काम करण्याची खुनगाठ मनाशी बांधल्या नंतर त्यात जीव ओतून समर्पीत भावनेने स्वताःला झोकून देणे गरजेचे असते..अँक्टिव्हपे मँनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा धुरा सांभाळतांना मी प्रगतीच्या मार्गावर जातांना यशाची उतुंग भरारी घेणारच अशी ध्येयाचे शिखर गाठण्याची अजोड जिद्द बाळगून प्रामाणिक निष्ठेने अविरत परिश्रम घेतले.. आहे

त्याच कठोर मेहनतीचे फलित म्हणून आज माझी कंपनी गुणवत्तापुर्ण दर्जेदार सेवा देण्यात तेरा राज्यात अव्वल ठरतेय.. याचा मला सार्थ अभिमान अन् आनंदही असल्याची निखळ भावना  कंपनीचे सर्व्हेसर्वा तथा आजच्या पिढीसाठी एक आदर्शवत उद्योजक असणारे कंपनीचे एम.डी.दिपक कांबळे यांनी व्यक्त केलीय..
    
प्रत्येक यशाची कहाणी कठोर संघर्षातून पुढे गेलेली असते.परिस्थितीत कशी असो,संघर्षातून मिळालेल्या यश हे सहजासहजी मिळवलेल्या सामर्थ्याला कौतुक कधीच नसते.स्वतःबरोबर कंपनीची ही प्रगती केल्यामुळे महाराष्ट्रसह अन्य राज्यात अँक्टिव्हपे मॅनेजमेण्ट सर्विसेस प्रा.ली.माध्यमातून खुप काबाड परिश्रम घेतल्या नंतर माझ्यासह कंपनीचे नावलौकिक झाले आहे

याबद्दल मी समाधानी असून  लहानपणा पासून आर्थिक परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातून शहरात संघर्षमय प्रवास केला.
      
तसेच अल्पभूधारक व सामान्य कुंटुबातून घरात शैक्षणिक वातावरण व वडिलांची आर्थिक परिस्थिती नसतांना जिद्दीने कसाबसा शिक्षणपूर्णा  करत आज यशस्वीपणे माझी कंपनी तेरा राज्यात काम करीत असल्यामुळे मी समाधान असून *जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.याहेतूने देगलूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित साठी राखीव असल्यामुळे या मतदारसंघाचा लेखाजोखा माहिती घेताना देगलूर -बिलोली तालुक्यातील असंख्य सुशिक्षित बेरोजगार कामाच्या शोधात पुणे-मुंबई, आणि तेलंगणा,आंध्रप्रदेश  राज्यात गेले आहेत  
  
तसेच या राखीव देगलूर मतदारसंघातील दोन्ही तालुक्याचा आढावा घेताना बहुतांशी सामान्य जनता या राखीव मतदारसंघात वंचित आहे.अशी माहिती पुढे आल्याने   तहसील प्रशासन, कृषी विभाग,आरोग्य विभाग,पाणी पुरवठा विभाग,ग्रामीण व वाडी तांड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दयनीय अवस्था सह शेतकऱ्यांच्या शेती बांध्यावर जाऊन बळीराजाच्या समस्य जाणून घेताना मनाला खुप वेदना झाल्या तर हा मतदारसंघात राखीव असल्याने शासनाच्या विविध योजनेपासून असंख्य जनता वंचित असल्याचे ही निदर्शनास आले

तसेच अनेकांनी मला प्रत्येकशात भेटून येथील समस्या सांगताना एक गोष्ट आवर्जून सांगितली की,देगलूर विधानसभा मतदारसंघात अजूनही बौद्ध समाजाला देखील येथील राज्य कार्त्यांनी उमेदवारी दिली नसल्याची खंत व्यक्त केली.हे विशेष
     
देगलूर विधानसभा मतदारसंघ हा २००९  मध्ये असित्वात आला असून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.त्या अनुषंगाने देगलूर मतदारसंघाची लोकसंख्या चार लाखांच्या घरात आहे

त्यामध्ये देगलूर तालुक्यात दोन लाख 30 हजार तर बिलोली मध्ये एक लाख ८५ हजार एवढी लोकसंख्या देगलूर पोट निवडणुकीच्या जणगणनेनुसार असून देगलूर मध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गण आहेत. तर बिलोली तालुक्यातील  जिल्हा परिषदेचे  चार गटासह आठ पंचायत समितीच्या गणांचा समावेश आहे.

देगलूर मतदारसंघातील सामान्य नागरिक शासनाच्या विविध योजने पासून आजही वंचित आहेततर वाढती महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून मी बिलोली- देगलूर मतदारसंघातील भूमीपुत्र असल्याने बेरोजगार अन् मोलमजुरी करणाऱ्याच्या हाताला काम मिळवून शासनाच्या योजना गांव तेथील शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळावा या हेतूने या मतदारसंघात मी फेरफटका मारला असता

काही हितचिंतक राजकीय लोकप्रतिनिधी अन् तमाम जनतेने या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आशावादी प्रश्न उभा केल्याने आगामी २०२४ विधानसभेची निवडणूक देगलूर या राखीव मतदारसंघ मधून दिपक कांबळे हे निवडणुकीच्या रिंगणात रणशिंग फुकणार काय ? याकडे संबंध देगलूर मतदारसंघाचे लक्ष वेधले आहे. 
 
          धन्यवाद :- दिपक कांबळे एम.डी.
 अँक्टिव्हपे मॅनेजमेण्ट सर्विसेस  प्रा.ली.नांदेड

Post a Comment

0 Comments