नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून नायागांव तालुक्यातील मौजे सावरखेडच्या विकास कामासाठी दहा लाख रुपयाच्या निधीचे तर मौजे आंतरगाव येथे एकूण पाच लाख रुपयाच्या विकासकामचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार व रुपेश देशमुख कुंटूर यांच्या हस्ते दिनांक २१ जुन २०२३ रोजी करण्यात आले आहेतालुक्यातील सावरखेड ग्रामपंचायतच्या विद्यमान महिला सरपंच सौ सरपंच जयश्री धोंडीबा इजगरे उपसरपंच नारायण तुकाराम पाटील ढगे यांच्यासह गावातील उदघाटन प्रसंगी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावच्या सरपंच सौ जयश्री इजगरे व उपसरपंच यांनी खासदारानी गावासाठी दिलेला दहा लाखाचा निधी हा सी सी रस्त्यासाठी दिला असल्यामुळे गावा अंतर्गतचे रस्ते चांगल्या प्रकारे करणार असल्याच्या सौ सरपंच म्हणल्या आहेआंतरगाव येथील ग्रामपंचायतचे सरपंच गजानन पाटील तोडे यांनी सुद्धा भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकराच्या माध्यमातून दिलेला निधी हा पाच लाख रुपयाचा असल्यामुळे गावाच्या विकासात भर पडली असल्याची प्रतिक्रिया विद्यमान सरपंच गजानन पाटील तोडे यांनी सांगितले असून या पूर्वी सुद्धा या गावात सरपंच यांनी निधी मंजूर करुन घेतला होता त्या कामाच्या अनुषंगाने या गावांत विकास करत असल्याचे गावकऱ्यानी सांगितले आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघात भाजपा पक्षात दोन गट पडले असल्याने ८९ विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांनी काल परवाच रस्त्याचे उदघाटन करण्याचा सपाटा उठवला होता त्यानंतर जिल्हाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निधीतुन आलेला सावरखेड येथे एकदरीत १० लाख रूपयाच्या निधीचे उदघाटन खासदाराच्या नेतृत्वाखाली माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार आणि रुपेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते मोठया थाटात करण्यात आले आहे

0 Comments