Header Ads Widget

धर्माबाद येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला तुफानी प्रेक्षकाची गर्दी " अन " पोलिसांचा चहात्यावर दे दणा दण दहा मिनिटात उडाला कार्यक्रमांचा फज्जा

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद मध्ये एका वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील यांचा कार्यक्रमाचे दिनांक १७ जुन २०२३ रोजी रोजी आयोजन करण्यात आले होते परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी तुफानी गर्दी झाली आहे

धर्माबाद येथे मौढा येथे सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे आणि सदरच्या गौतमी पाटील स्टेजवर येतात तिच्या चहात्यांनी स्टेज जवळ जाण्यासाठी मोठी गर्दी करण्याच्या तयारीत असल्यामुळे धर्माबाद पोलिसांना थोडक्यात लाठी चार्ज करावा लागला असल्याचे व्रत असून सदरच्या कार्यक्रमाचा अवघ्या दहा मिनिटात फज्जा उडाला असल्याचे या ठिकाणी दिसून आले आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा संपर्क प्रमुख तसेच जिल्हा परिषद नांदेडच्या माजी उपाध्यक्ष पद्माताई सतपलवार यांचे सुपुत्र तथा प्रतिनिधी आकाश भाऊ रेड्डी यांचा वाढदिवस दिनांक १७ जुन २०२३ रोजी धर्माबाद येथे साजरा करण्यात आला आहे

या वाढदिवसा निमित्ताने महाराष्ट्राची लाडकी नर्तिका गौतमी पाटील यांच्या नृत्यांचा कार्यक्रम धर्माबाद येथे मोंढा मैदानावर रात्री ७ ते १० वाजण्याच्या आयोजित करण्यात आला ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता परंतु चाहत्याचा गोंधळ झाल्यामुळे पोलीसांना दे दणा दण करावा लागला आहे

आकाश रेड्डी यांनी जिल्ह्यात प्रथमच गौतमी पाटील यांचा कार्यक्रम होत असल्याने प्रेक्षका कडून सहकार्याची अपेक्षा करीत होते पण आसन व्यवस्था व नियोजनाच्या अभावामुळे केवळ गोंधळ होऊन गेला व प्रेक्षकांना त्रास व मार खावा लागला अगोदरच प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील यांचा कार्यक्रम अयशस्वी झाला आहे



Post a Comment

0 Comments