Header Ads Widget

टिप्परच्या धडकेत गंभीर जखमी मारोती व्हँनशेट्ये कार्लेकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू


विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
 

बँकेत कामासाठी मुलांसमवेत दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या टीप्परने जोरदार धडक दिली.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वडीलांचा १९ जून रोजी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.हा अपघात १९ जून रोजी दुपारी कार्ला त.मा. ते कार्ला फाटा रस्त्यावर एका पुलाजवळ घडला आहे

मयत शेतकऱ्यावर २० जून रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात कार्ला त.मा.येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.याघटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

मारोती मोतीराम व्होनशेट्टे कार्लेकर (७२) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कार्ला त.मा. ता.नायगाव येथील मन्मथ मारोती व्होनशेट्टे हे १९ जून २०२३ रोजी आपल्या वडीलांना सोबत घेऊन बँकेच्या कामासाठी म्हणून रातोळी येथे दुचाकीवरून जात असताना कार्ला त.मा. ते कार्ला फाटा रस्त्यावर एका पुलाजवळ रस्त्यालगत कडेला गाडीवरच थांबले असताना पाठीमागून येणाऱ्या एम एच २६ एबी १९१९ क्रमांकाच्या टीप्परने जोरदार धडक दिली.
   
यात मन्मथ हे रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले तर त्यांचे वडील मारोती व्होनशेट्टे हे टीप्परच्या मागील टायरखाली आल्याने गंभीर जखमी झाले होते 

अपघातानंतर घटनास्थळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली.गंभीर जखमीस नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले.तिथे उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.२० जून रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्यावर कार्ला त.मा.येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

याघटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.मयताच्या पश्चात पत्नी,भाऊ, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments