Header Ads Widget

शेतकऱ्यांच्या हितासाठी कुंटूर मार्केट कमिटीच्या माध्यमातून काँग्रेस व भाजपा युती सरसावली -सभापती व उपसभापती

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्केट कमिटीच्या माध्यमातून काँग्रेस व भाजपा युती सरसावली असल्याचे सभापती बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर व उपसभापती मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे मत असून सदरच्या मार्केट कमीटीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे

तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी अगोदर पासूनच घाट्यात असल्यामुळे व उत्पन्न झिरो असल्याने सदरील मार्केट कमिटीचा विकास खुंटला असून या पूर्वी कृष्णूर  एमआयडीसी अंतर्गत चालणाऱ्या कंपन्या कडून कुंटूरच्या मार्केट कमिटीला टॅक्सच्या माध्यमातून उत्पन्न मिळत होते परंतु पणन मंडळाचे लायसन्स घेऊन सदरच्या कंपन्या त्यांच्या कडे टॅक्स भरत असल्याने सदरची मार्केट कमिटी तोट्यात आली आहे

कुंटूर मार्केट कमिटीच्या उत्पन्नाचा दर्जा वाढवण्यासाठी व स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी होणाऱ्या उत्पन्नामधून मार्केट कमिटीची इमारत बांधणार असल्याचे ही सभापती बाळासाहेब उर्फ अंबादासराव धर्माधिकारी व उपसभापती मनोज पाटील मोरे टाकळीकर यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments