Header Ads Widget

पंदरा हजार लोक संख्येच्या बरबडा गावात नागरिक नांदतात सुखा समाधानाने !!

               माधव पवार
नायगाव तालुक्यातील बरबडा हे गाव पंदरा हजार लोक संख्येचे असताना सुद्धा या गावात अतिशय शांतपणाने नागरिक सुखा समाधानाने नांदत असतात या एवढ्या मोठ्या गावामध्ये छोटे मोठा वाद झाल्यास गावातील नागरिक गावातच मिटवण्याचा प्रयत्न करून सदरचे तंटे मिटवीत असतात असे सांगण्यात येत आहे

अशा या गावात जनसामान्य माणूस शांतपणाने राहात असतात एकमेकांच्या समस्या समजून घेऊन वाद नको गावात शांतता हवी असे या गावाचे मुख्य वैशिष्ट्य असल्यामुळे सदरचे गाव वाद मुक्त गाव असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

तालुक्यातील बरबडा नगरीत गेल्या अनेक वर्षापासून अनेक जाती धर्माचे लोक शांतपणे राहतात एखांदी गंभीर घटना घडली असेल तर ती बाब वेगळी असली तरी छोटे मोठे तंटे गावातीलच प्रतिष्ठित नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकानीच मिटवीत असतात अशा या वाद मुक्त गावाचा आदर्श घेणे अत्यंत गरजे आहे

या गावात तुरळक काही गंभीर घटना वगळता या सदरच्या बरबडा गावात वादच होऊ शकत नाही त्यांचे कारण म्हणजे गावाची एकी आणि गावाला गाल बोट लागू नये म्हणून या नगरीतील लोक वचनाला कटिबद्ध असल्याचे ही चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

गेल्या ७० ते ७५ वर्षाच्या कार्यकाळात या गावात केवळ  ॲट्रॉसिटी सारखी गंभीर घटना एक किंवा दोन ? यापेक्षा या गावात कसल्याच प्रकारचे गुन्हे घडले नाहीत सदरच्या गावात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी विविध पक्षांची मंडळी या गावात वास्तव्यास असली तरी गावात शांतताच राहिली पाहिजे हा विषय डोळ्या समोर ठेवून कायमची शांतता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न गावकरी करीत असतात असे ही वास्तव चित्र या गावातील आहे 

Post a Comment

0 Comments