नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कृष्णूर येथे दिनांक १९ जुन २०२३ रोजी नुकताच जुगार खेळणाऱ्याच्या आड्याचा नारळ फुटला परंतु नुकतेच पदभार स्विकारलेले सपोनि विशाल एन बहातरे यांनी नूतन जुगार आड्यावर धाड मारून बेहत्रीण कामगिरी केली आहे
सदरच्या मारलेल्या धाडीत दहा जुगाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल ? करण्यात आला तर नऊ मोटार सायकली जप्त केल्या आणि पाच आरोपी पोलीसानी ताब्यात घेतले तर पाच फरार झाल्याची माहिती मिळते आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कृष्णूर येथे जुगार आड्याचे जुगाऱ्यानी मोठ्या थाटात फोडले परंतु सदरच्या धोरणाचे नुकतेच रुजी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एन बहातरे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जुगार आड्यावर दमदार धाड मारून अडा उधवस्त केला असल्यामुळे रुजू होताच सपोनि विशालच्या विशाल कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्या कडून कौतुक होत असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी व धर्माबाद पोलीस ठाण्यात बदलीवर गेलेले एस एम कुमरे यांनी सुद्धा मोठ मोठाल्या दारू आड्यासह जुगार खेळणाऱ्यावर धाडी मारून अड्डे उधवस्त केले होते त्या नुसार नुकतेच रुजु झालेले सपोनि विशाल बहातरे यांनी जुगार अड्डयावर धाड मारली आणि जुगाऱ्याच्या उरात चांगलीच धडकी भरवली पहिला झटका जुगार अड्डयावर तर दुसरा झटका मटक्यावर बसण्याची शक्यता ? वर्तवली जात आहे

0 Comments