Header Ads Widget

कसायाची हिंमत वाढली अन गोरक्षकावर तिसंऱ्यादा हल्लाची पुनरावृत्ती घडली


हिमायतनगर  : नागोराव शिंदे  := 

जिल्ह्यातील प्रशासनाचे या हल्लेखोरांवर अजिबात वचक राहीलेली नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे कसाई आणि पोलीस यांचे अर्थपुर्ण संबंध. म्हणुनच नांदेड जिल्ह्यातील कसायांचे मनोबल वाढलेले आपल्याला वारंवार अशा घटनांमधुन पहावयास मिळत आहे.

१) पहीला हल्ला दि १७/०६/२०२३ रोजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर किरण बिच्चेवार यांच्यावर, सदरील हल्यातील आरोपींवर थातुरमातुर कारवाई केली गेली आणि किरण बिच्चेवार यांच्यावर देखील कारवाई केली गेली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यालाही तशीच वागणुक आणि कायद्याचे पालन करणाऱ्यांना देखील तशीच वागणुक यामुळे कसायांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

२) दुसरा हमला दि १९/०६/२०२३ रोजी सुनियोजित कट रचुन शहीद गोरक्षक शेखर रापेल्ली वर आणि ईतर ७ गोरक्षक कार्यकर्त्यांवर झाला आहे. या हल्यातील आरोपी जरी अटक केले गेले तरीही त्यांना मदत करणाऱ्या संबंध टोळीला ताब्यात घेतले गेले नाही.

 हे १९ तारखेच्या कटात ईतर गावातील समाजकंटक सहभागी आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.

३) तिसरा हल्ला आज दि २९/०६/२०२३ रोजी  माहुर जिल्हा नांदेड येथे सोनु पाटील चौधरी यांच्यावर आज रात्री ७  वाजताच्या सुमारास झाला आहे. माहुर शहरात काल पासुन हे हल्लेखोर सोनु पाटील च्या शोधात फिरत होते मग पोलीस प्रशासनाच्या का लक्षात आले नाही. पोलीस प्रशासन समजुन न समजण्याचे सोंग घेत आहे. 

भोकर शहरात ईदनिमित्त कुर्बानीसाठी बेवारसपणे बांधुन ठेवलेले गोवंश विश्व हिंदु परिषदेचे शहरमंत्री शंकर नारमवाड व बजरंग दल जिल्हा सहसंयोजक पंजाब हुलगुंडे यांनी पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणुन दिले. प्रशासनास पुर्ण सहकार्य केले आहे

तरी ही विनाकारण १४९ च्या नोटीस देऊन एकप्रकारे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम पोलीस प्रशासन करत असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील बहुतांशी पोलीस स्टेशन मध्ये दिसत आहे.
धन्यवाद

Post a Comment

0 Comments