Header Ads Widget

भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत माजी आमदारानी खेचली भाजपाला काँग्रेसचा दे धक्का !!

        माधव पवार
नुकत्याच पार पडलेल्या नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह कुंटूरच्या मार्केट समितीवर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह राजेश देशमुख कुंटूरकर मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी सदरच्या बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप युती करून सत्ता प्रस्थापित केली आहे
नायगाव तालुक्यातील रातोळी ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या निवडणुकी दरम्यान विधान परिषदेचे भाजपाचे विद्यमान आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या गटाच्या ताब्यात असलेली सदरची ग्रामपंचायत नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी खेचून घेतले असल्यामुळे भाजपाला चांगलाच काँग्रेस कडून चांगलाच दे धक्का बसला असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहेतालुक्यातील रातोळी ग्रामपंचायत कार्यालय ही  विधान परिषदेचे विद्यमान आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या गटाच्या ताब्यात होती त्यांच्या सदस्याच्या सहकार्याने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गटात समाविष्ट झाल्यामुळे चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व मानल्या जात आहे

रातोळी या गावची ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत कमलबाई शिवराज माली पाटील ह्या दिनांक ६ जुन २०२३ रोजी बिनविरोध निवडून आल्याने विद्यमान भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्याच मूळ गावात माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गटाचा जल्लोष व फटाक्याची आतिषबाजी करण्यात आलेली आहे

Post a Comment

0 Comments