Header Ads Widget

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पालघर संघाने पटकावले विजेतेपद नाईन ए साईड क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट स्पर्धेची उत्साहात सांगता


नांदेड : दिंगबर शिंदे :-:

नांदेड दक्षिण आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  नाईन ए साईड क्रिकेट  संघटनेच्या वतीने नांदेडच्या श्री गुरुगोविदसिंघजी स्टेडियम मैदानावर दि. ४ जुन पासुन  क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली . दि. ६ जुन रोजी बक्षीस वितरण समारंभ  मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यात पालघर क्रिकेट संघाने स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दि.६ जुन रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडला. यावेळी संतोष पांडागळे, सामाजिक कार्यकर्ते हाफीज अब्दुल रशीद साहब, प्रदीप गिरी, विक्की राऊतखेडकर,  राज्य सचिव  तथा संयोजक शेख असलम, राहुल वाघमारे, मो. अझहर यांची उपस्थिती होती

मान्यवरांच्या हस्ते विजेते संघ पालघर ( प्रथम), परभणी शहर ( द्वितीय), तर हिंगोली क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक पटकावला.  प्रतीक यादव ( सामनावीर), अक्षय राठोड ( उत्कृष्ट फलदांज), प्रतीक यादव ( मालीकावीर ), युवराज तांबे ( उत्कृष्ट गोलंदाज), दिव्यांशी मेहेर ( उत्कृष्ट यष्टिरक्षक) हे ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते  पारितोषिके, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

 स्पर्धा यशस्वी होण्यासाठी  मुक्रम शेख, विनोद जमदाडे, 
संदीप कदम, रोशन जोगदंड, सय्यद अयाज खादरी, महम्मुद मुबीन, आय्याज सय्यद,  आकाश बनसोडे, मुकुंद डमरे, , शेरखान पठाण, शक्ती धोंडगे,  संतोष कांबळे परीश्रम घेत आहेत. यावेळी पंच म. अत्तर, भरत चव्हाण, मोईन अब्दुल रहीम, गुणलेखक हरमीतसिंग कापसे, समालोचन अ.हफीज खान तर संचालन व आभार प्रदर्शन दिगंबर शिंदे यांनी भूमिका पार पडली

Post a Comment

0 Comments