Header Ads Widget

नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हदीत मित्रावर गोळीबार करून आरोपी फरार - पोलीस घटनास्थळी रवाना जखमीला शासकीय रुग्णालयात केले दाखल

        माधव पवार
नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सिद्धार्थ नगर येथे क्षुल्लक कारणा वरून एका मित्राने सोबत असलेकल्या मित्रावर पिस्तूलच्या साहाय्याने फायरिंग केल्यामुळे या घटनेत साहेबराव मनोहर जोगदंड हा गंभीर जखमी झाला यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी मित्र मात्र घटनास्थळा वरून फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या घटनेतील जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकानी दाखल केल्याची माहिती मिळते सदरची घटना ही दिनांक १ जुन २०२३ रात्री ८ ते साडे वाजण्याच्यादरम्यान घडली असून शहरातील भाग्यनगर पोलीस हद्दीत असलेल्या नेहर अर्थात कॅनल रोडवरच्या सिद्धार्थनगर मध्ये घडली आहे

क्षुल्लक करणा वरून यातील आरोपी शुभम पारदे उर्फ भाऊबल्ली यांनी जखमी साहेबराव मनोहर जोगदंड यांच्या पोटात समोरुन गोळी झाडली या घटनेत जोगदंड जखमी झाला तर आरोपी घटनास्थळा पासून फरार झाला या दोघात काही क्षुल्लक म्हणजे जुन्या भांडणाच्या करणाहुन तंटा झाला असल्याचे सांगण्यात येते आहे

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत या घडलेल्या घटनेतील आरोपी शुभम पारदे यांनी आपल्या जवळची पिस्टल काढून साहेबराव जोगदंड यांच्या समो रुन पोटात गोळी झाडली असल्यामुळे तो रक्त बंभाळ झाला असल्याने जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाईकानी उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सदरची घटना घडवून शुभम हा घटना स्थळा पासून फरार झाला आहे

नांदेड शहरात घडलेल्या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार त्याच बरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर सुरज गुरव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सदरच्या घटनास्थळी दाखल झाले व घटनेची पाहणी करून सदरचा गोळीबार कशामुळे करण्यात आला यांचा तपास भाग्यनगर पोलीस करीत आहेत 





 

Post a Comment

0 Comments