Header Ads Widget

भूकमारीच्या २३ वर्षीय अमोल पवारचे प्रेत सडलेल्या अवस्थेत सोमठाणा येथे रस्त्याच्या खड्यात सापडले कुंटूर पोलीस घटनास्थळी रवाना

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सोमठाणा ते गडगा राज्य महामार्गावर असल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर विद्यालयाच्या १०० मीटर अंतरावर असलेल्या रस्त्याच्या चार फूट नालीत कंधार तालुक्यातील भूकमारीचा रहिवासी असलेला शंकर संतराम पवार यांचा मुलगा अमोल शंकर पवार वय २३ वर्षा यांचा मृतदेह डोक्या पासून कंबरे पर्यंत सडलेल्या अवस्थेत दिनांक २ जुन २०२३ रोजी सकाळी दुर्गंधी सुटल्यामुळे सापडला आहे

कंधार तालुक्यातील भूकमारीचा २३ वर्षीय युवक नायगाव तालुक्यातील मोजे सोमठाणा येथे मटण आणण्यासाठी दिनांक २८ मे २०२३ रोजी आला होता असे सांगण्यात येते सदरील घटनेची माहिती कळताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या बरबडा बिटचे ए एस आय नागोराव पोले, ए एस आय निकाते, पोहेका लक्ष्मणराव सोनकांबळे पोहेका कंधारे, यांनी सदरील घटनेची पाहणी करून पंचनामा केला आहे 

भूकमारीच्या अमोल पवार यांचा मृत्यूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूू उष्मघाताने झाला असावा असा अंदाज कुंटूर पोलीसाचा अंदाज आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला सदरील घटनेच्या ठिकाणी सोमठाणा येथे पोलीस जीप चालक पोहेका सदाशिव पाटील, बुद्देवाड यांनी घटनास्थळी दाखल झाले  सदरील घटनेतील मयत अमोल शंकर पवार यांची ओळख त्यांच्या चप्पल व कपड्या वरून पटली असल्याचे मयताचा चुलता शिवाजी संतराम पवार यांनी कुंटूर पोलीसांना सांगितले आहे 

भूकमारीच्या २३ वर्षीय युवकाची घडलेली घटना दिनांक २ जुन २०२३ रोजी सदरच्या सडलेल्या अमोलच्या प्रेतांची दुर्गंधी सुटल्यामुळे ही घटना उघडकीस आली अल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटचे पोलीस कर्मचारीशंकर घटना स्थळी रवाना होऊन घटनेची पाहणी केली व पंचनामा केला असून सदरच्या प्रेताचे जाग्यावरच शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बरबड्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ पबीतवार यांना घटनास्थळी बोलावण्यात आले आहे




Post a Comment

0 Comments