माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावातील स्क्रीन टच मोबाईल वापरणाऱ्या मोबाईल धारकांना सूचित करण्यात येते कीठाण्याचे पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक गुट्टे यांनी महापुरुषाच्या संदर्भात कोणी वादग्रस्त पोस्ट टाकून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर खबरदार थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा
पोलीस निरीक्षक जयप्रकाश के गुट्टे यांनी दिला आहे
तालुक्यातील नायागांव शहर लोकसंख्येच्या बाबतीत मोठे शहर असल्यामुळे या कार्यक्षेत्रात ठाण्याचा एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून माझी पोलीस टीम चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे या ठाण्याच्या अंतर्गत कोणत्या ही व्यक्तीने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल त्यांची कसल्याच प्रकारची गय केली जाणार नाही व आमची सर्व पोलीस यंत्रणा शोशीय मीडियावर लक्ष ठेवून असल्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी सांगितले
सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम बांधवाचा दिनांक २९ जुन २०२३ रोजी बकरी ईद हा धार्मिक उत्सव असल्यामुळे कोणत्या व्यक्तीनी वादग्रस पोस्ट टाकून कोणाच्या भावना दुःखवल्यास गप्प बसणार नाही अथवा त्यांना पाठीशी घालणार नाही असे ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक जयप्रकाश के गुट्टे यांनी सांगत म्हणाले की सध्या व्हाट्सअप इस्टाग्राम सोशीय मीडियावर वादग्रस्त केले जाताना बातम्या येत असल्या तरी नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वादग्रस्त पोस्ट केल्यास मात्र त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे पोनि गुट्टे यांनी सांगितले

0 Comments