Header Ads Widget

हिंगोली जिल्ह्याच्या हळदीला देशात ‘एक नंबर’ वर नेणारा खासदार हेमंत पाटील शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गौरवोद्गारमुख्यमंत्र्यांची हळद संशोधन केंद्राच्या स्टाँलला भेट

 हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिंगोली जिल्ह्याच्या हळदीला देशात एक नंबरवर पोहचविणारे खासदार हेमंत पाटील आहेत. त्यांच्यामुळेच हळद उत्पादन करणारा देशातील एक नंबरचा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख झाली आहे.

या सहीत नांदेड आणि परभणी देखील अग्रेसर असल्यामुळे मराठवाड्यामध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले असून १०० कोटीचा निधी मंजूर केला आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी काढले. अबचलनगर येथे रविवारी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, येथे उत्पादीत होत असलेल्या हळदीच्या लागवडीमुळे शासनातर्फे शंभर कोटी निधी दिला आहे. यापुढे कामाची व्याप्ती वाढत राहील त्याप्रमाणे आणखी निधी नक्कीच देता येईल. दरम्यान, खासदार हेमंत पाटील यांनी आजपर्यंत अनेक सरकार आले

पण ते दारी कधीच आले नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त करून  मुख्यमंत्र्यांच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी देण्यात आलेल्या निधीबद्दल आभार मानले. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, खासदार हेमंत पाटील  कृषिमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदयजी सामंत,आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर आदींनी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या स्टाँलला भेट दिली.  येथे हळद केंद्रातील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांना खासदार हेमंत पाटील यांच्याकडून हळदीची खास भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांनी संशोधन केंद्राच्या स्टाँलला भेट दिली. यावेळी प्रक्षेत्रावर लागवडीकरीता उपलब्ध झालेल्या भारतातील विविध ३२ हळद वाणांची माहीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. यासहीत संशोधन केंद्रातील कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.

दरम्यान, शेतकर्यांनी उत्पादीत केलेल्या नैसर्गिक हळद उत्पादनाची भेट दिली. यात हळद पावडर, अमोधा (आंबे हळद) हळदीचे लोणचे, चिप्स आदींचा समावेश होता.

देशात प्रथमच होणार ३२ वाणांची लागवड

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे उभारण्यात येत असलेल्या मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये हळदीच्या ३२ वाणांची लागवड होणार आहे. हा देशातील पहिलाच प्रयोग असून या वर्षी ही लागवड केली जाणार आहे.

प्रमाणपत्रधारी शेतकरी-मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्यातर्फे हळद पिकामध्ये उल्लेखनीय कार्य आणि वेगवेगळे प्रयोग केलेल्या शेतकर्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार केला. यामध्ये  संदीप डाकुलगे, लक्ष्मीकांत मोरे, माधव बनगर, विश्वनाथ होळगे, प्रकाश देशमुख, तुकाराम गावंडे, भगवान इंगोले या शेतकर्यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments