हिमायतनगर : नागोराव शिंदे :
हिमायतनगर तालुक्यातील वडगाव जवळील मोरगाव येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पूजा देवजी चिरपकटलेवार रा. मोरगाव येथील सोळा वर्षेय शाळकरी विद्यार्थिनी भोकर येथील घिसेवाड यांच्या शाळेत ११ व्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी बस स्टॉप वर जात असताना सदरचा अपघात घडला आहे
भरधाव वेगाने आलेला एम एच ३८ डी ०२८४ ह्या ट्रक चालकाने या मुलीस चिरडल्याची घटना आज दि २७ जून च्या सकाळी घडली तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या वडगाव येथील वामनराव मिराशे यांनी ही मुलगी मोरगाव येथील देवकर महाराज यांची मुलगी असल्याचे सांगितले
त्यामुळे संबंधित ट्रक चालक हा घटनास्थळा वरून प्रसार झाला होता त्याचा शोध घेऊन हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी. डी. भूसनूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी सदरील आरोपीस ताब्यात घेतले असल्याचे सांगितले..
सदरील घटनेचे तपास तामसा पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी हे करीत आहेत..

0 Comments