गेल्या वर्षा पेक्षा यंदा उन्हाळ्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजविला होता परंतु सध्या पेरणीचे दिवस असताना पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे
शेतकऱ्यांनी आपल्या शेताची पूर्ण मशागत करून पाऊस कधी पडेल पेरणी कधी लागेल असा विचार करीत आकाशाकडे पाहत असताना दिसून येत आहे
ग्रामीण भागात मात्र उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊस व गाराचा पाऊस त्याच बरोबर विजेचा कडकडाट होऊन अनेक झाडे मोडली अनेकांच्या घरा वरील टीना पत्र उडाले शेतकऱ्यांच्या उन्हाळी लागवडी बरोबर बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते
अधिकृत ऋतू प्रमाणे पावसाळ्याचे दिवस असल्याने सुद्धा ऐण पावसाळ्यात उन्हाळ्या सारखे कडक ऊन पडत असल्याने पावसाळ्याला उन्हाळ्याचे स्वरूप आले आहे
पावसाळ्यात उन्हाळा हा ऋतू प्रमाणे नियम नसला तरी सध्याच्या परिस्थिती मध्ये भयंकर गर्मी होत असून पावसाचा मात्र बेपत्ता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या चांगल्याच खोळंबल्या असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण प भागात येत आहे
शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात अवण्याचे पावणे कर्ज काढून खत बी बियाणे खरीदी करुन घरात आणून ठेवले खरे परंतु पाणीच पडत नसल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण होताना दिसून येत आहे

0 Comments