नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र या मतदार संघांचे भावी आमदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांच्या विशेत उपस्थितीत अर्थ सह्य व साडी चोळीची मदत करण्यात आली आहे
नामफाउंडेशनच्या माध्यमातून डॉ.यशवंत चव्हाण यांनी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य व साडी चोळीची मदत केली असल्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
८९ मतदार संघाच्या नायगाव तालुक्याचे भावी आमदार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्यासह नाम फाउंडेशनचे
तालुका समन्वयक भा ग मोरे सल्लागार जाधव यांच्या डोळस विचारातून व त्यांच्या प्रयत्नातून सदरची मदत करण्यात आली आहे
तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी सहदेव आबाराव शिंदे पळसगाव शंकर मोहनराव भाकरे गडगा, चंपती आनंदा जाधव सातेगाव, यांच्या कुटुंबाना सर्वांच्या परिचयाचे डॉ.यशवंत चव्हाण यांच्या वतीने आर्थिक मदत व साडी चोळी देण्यात आले आहे
यावेळी नायगाव येथील युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण डॉ.प्रतापराव चव्हाण नाम फाउंडेशनचे तालुका समन्वयक भा.ग मोरे सल्लागार जाधव पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी बालाजी शिंदे यांच्यासह आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे सदरील कुटुंबियातील व्यक्ती यावेळी उपस्थित होते

0 Comments