माधव पवार : किरण हणमंते -
नायगाव तालुक्यातील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबड्याचा ९८.६ टक्के निकाल विध्यार्थाचे संस्था चालका कडून अभिनंदन व कौतुक केले आहे
तालुक्यातील बरबडा जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच ९८.६ टक्के लागला असल्यामुळे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे
बरबडा येथील सदरच्या विद्यालयातून शरद गौतम हनमंते यांनी ९५.६० टक्के घेऊन प्रथम तर कुमारी मेघा शेवाळे ९४.४० टक्के गुण घेऊन दुसरा क्रमांक पटकावली तर तिसऱ्या क्रमांकात दोन विध्यार्थीनी कुमारी शुभश्री गंगाधर रायकवाड ९३.८० टक्के आणि कुमारी अनघा महेश रेगुडे ९३.८० टक्के कॉमन गुण मिळवून विद्यालयातुन उत्तीर्ण झाल्या आहेत
जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथील इयत्ता दहावीचा निकाल दिनांक २ जुन २०२३ रोजी दुपारी एक वाजता लागला यात या शाळेचा९८.६ टक्के निकाल लागला तर सदरच्या शाळेत एकूण २०७ मुलांनी दहावीची परिक्षा दिली होती त्यापैकी १६६ मुले विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर त्यातील २३ विद्यार्थी ९० टक्केच्या वर विध्यार्थी पास झाले आहेत
त्यांच्या यशा बद्दल सर्व गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी यांच्यासह सर्व संचालक मंडळ,शाळेचे उपमुख्याध्यापक गणेश बडूरे प्रयवेक्षक सुर्यकांत फड ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक वसंत शिंदे व किरण हणमंते यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे

0 Comments