Header Ads Widget

घुंगराळा जिल्हा परिषद हायस्कूल येथे जिल्हा उपशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्या पुस्तकांचे वाटप

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा जिल्हा परिषद हायस्कूल येथे दिनांक १५ जुन २०२३ रोजी शासनाने सर्व शाळा उघडण्याचे आदेश जारी केल्याच्या नंतर शाळा पूर्ण पणे चालू करण्यात आल्या सदरच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी विध्यार्थी ही मोठया संख्येने उपस्थित होते जिल्हा उपशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शाळेचे मुख्याध्यापक बोडके यांनी शासनाच्या मार्फत आलेले मोफत शालेय पाठ्यापुस्तकाचे वाटप केले आहे

तालुक्यातील मौजे घुंगराळा जिल्हा परिषद हायस्कुल येथे मुख्याध्यापक बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक वर्ग शाळा चालू होतात शाळेत येणाऱ्या विध्यार्थीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करीत असतात त्याच प्रमाणे या वर्षी दिनांक १५ जुन रोजी शाळेला सुरुवात झाल्याच्या शाळेच्या वतीने विध्यार्थीचे अभिनंदन केले आहे

घुंगराळा जिल्हा हायस्कुल शाळेच्या पहिल्याच दिवसी नांदेड जिल्हा परिषदच्या उपशिक्षण अधिकारी वडजकर मॅडम तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी शिंगाडे यांच्या  विशेष उपस्थित भारताचे राष्ट्रपती स्व. ए पी जे अब्दुल कलाम मिनी सायन्स सेंटर लॅबपा भेट दिली आहे 

सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष  शाळेचे मुख्याध्यापक बोडके यांच्यासह बोरगावे, फावडे, कोमवाड गंड्रस कोठकर इंगळे अनकाडे शेख मॅडम चव्हाण रणखांबे कदम आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments