Header Ads Widget

बरबडा जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करण्यासाठी दोन महिलाना विकास करण्याची संधी मिळाली होती काही ना काही विकास करुन दाखविला !!

                माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघातील बरबडा जिल्हा परिषद गट हा तगड्या राजकीय पुढाऱ्यांचा असल्याचा मानला जातो गटाचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर व राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ मीनाक्षीताई डॉ शिवाजीराव कागडे यांना जी.प सदस्य होण्याची संधी मिळाली होती

तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटाची माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्व.रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर तसेच बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्यामुळे काँग्रेस पक्षाच्या माजी जी.प. सदस्यां सौ विजयाश्री पंढरीनाथ कमठेवाड यांना मिळाली होती

काँग्रेस पक्षाच्या विजयाश्रीताई पंढरीनाथ कुमठेवाड या दोन महिलाना जी.प. सदस्यांना या विभागाचा विकास करण्यासाठी पक्षांच्या माध्यमातून संधी देण्यात आली होती यांच्या पाच पाच वर्षांच्या कार्यकाळात बरबडा सर्कलचा विकास करण्यासाठी थोड्याच प्रमाणात का होईना निधी उपलब्ध करुन विकास करून दाखविला असल्यामुळे बऱ्याच पैकी गावात त्यांच्या विकासाचे कामे दिसून येत आहेत

या दोन्ही महिलाचा जिल्हा परिषद सदस्य पदाचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर गेल्या अनेक महिन्यापासून बरबडा जिल्हा परिषद गट हा विकासा पासून वंचित असला तरी व निवडणूक आयोग व सरकारने निवडणुका घेत नसल्यामुळे सदरचा जिल्हा परिषद गट हा वाऱ्यावर असल्याचे सदरचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

सन २०२४ मध्ये लागणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीच्या राजकीय वर्तुळात चर्चा होताना ऐकावयास मिळत असल्या तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी घेणार असा प्रश्न चर्चेला जात असून सदरचा बरबडा सर्कल हा जिल्हा परिषद सदस्या विना वाऱ्यावर या विभागाची चांगलीच वाट लागली असल्याची ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 



Post a Comment

0 Comments