नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील डबा पार्टीच्या कार्यक्रमात विविध समस्यावर तोडगा व समस्या सोडवित खेळीमेळीच्या वातावणात आमदार राजेश पवार व मांजरम जिल्हा परिषदेच्या माजी जि.प सदस्यां पूनमताई पवार यांच्या उपस्थितीत सदरच्या कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहेयावेळी एक शेतकऱ्यानी समस्या मांडत बोलताना म्हणाले की साहेब तुम्ही बरबड्याच्या विकासाठी मोठया प्रमाणात आणला म्हणून तुमच्या नावाची टाळी वाजत असलेल्या शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे
तालुक्यातील बरबडा येथे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार राजेश पवार यांनी शेतकऱ्याशी थेट सवांद साधला असताना अनेक शेतकऱ्यांनी व परिसरातील सरपंच व उपसरपंच यांनी अनेक समस्याच्या बाबतीत अडचणी मांडल्या आहेत
यात काही समस्याचे शंका समाधान आमदारानी केले कुंटूर येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत तात्काळ रुग्णाच्या सेवेत देण्यात यावेत बरबडा येथील आरोग्य विभागाची नूतन हे सुद्धा तात्काळ रुग्णाच्या सेवेसाठी देण्यात यावे असी मागणी आमदारा कडे शेतकऱ्यानी केल्या आहेत
तालुक्यातील बरबडा येथील बालाजीराव धर्माधिकारी यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या डबा पार्टीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेश पवार होते व्यासपीठावर सौ पूनमताई पवार दिलीपराव धर्माधिकारी बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी सरपंच माधवराव कोलगाणे व्यंकटराव सूर्यवाड गंगाधर बडूरे सदाशिवराव पाटील पचलिंग आदी उपस्थित होते
यावेळी बालाजीराव धर्माधिकारी निलेश देशमुख सतीश सिंगेवाड बालाजीराव जंगीलवाड अशोकराव मुगावकर देविदास बोमनाळे दत्ता पाटील गिरे बाबू पाटील शेवाळे श्रीहरी देशमुख प्रभाकर शेटे सोपानराव कदम शिवाजी पाटील शिंदे पळसगावकर रंजित पाटील ताकबीड मधुकर घोसलवाड आदी यावेळी डब्बा पार्टीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्यासह पूनमताई पवार यांच्या विशेषतः पार्टीच्या कार्यक्रमाला विशेष शेतकऱ्याची उपस्थिती लाभली होती ससदरील कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी करण्यात आली आहे

0 Comments