Header Ads Widget

मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत होत असलेल्या बरबडा ते कृष्णूर पुलाच्या कामाला गुत्तेदारा कडून गती - अधिकाऱ्यानी दिले लक्ष -

        माधव पवार
मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत होत असलेल्या बरबडा ते कृष्णूर पुलाच्या कामाला गुत्तेदारा कडून गती वाढविली असल्यामुळे सदरच्या गुत्तेदारा कडून कशा पद्धतीने काम केले जाते यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने लक्ष असल्यामुळे सदरच्या पुलाचे काम लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 
नायगाव तालुक्यातील बरबडा ते कृष्णूर रस्यावर असलेल्या महत्वाच्या पुलाच्या कामाची गुत्तेदारानी गती वाढविली असल्यामुळे या कामाकडे अधिकाऱ्यानी लक्ष दिले असल्याचे सदरच्या जनतेतून बोलल्या जात असून सदरचे काम हे जुलै महिन्याच्या शेवट पर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा जनतेसह गुत्तेदारानी व्यक्त केली आहे

तालुक्यातील बरबडा ते कृष्णूर रस्त्यावर होत असलेल्या नूतन पूल बांधकामासाठी शासनाने एकूण १४ पिल्लर उभे करण्यात येत असून सदरच्या कामाचा दर्जा वाढविण्यासाठी गुत्तेदार व अधिकारी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत असून बळेगाव गोदावरी पुलावर सुद्धा चौदा ते १६ पिल्लर करण्यात आले त्याच पद्धतीने या रस्त्या वरील पुलाचे काम मजबूत करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments