नायगाव तालुक्यातील मौजे हिप्परगा ग्रामपंचायत कार्यालय ही विकासाच्या दिशेने जात असल्यामुळे या गावांत सरपंच व उपसरपंच यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अंदाजे एक कोटी रुपयाचा विविध विकास झाला असल्याचा दावा गावचे उपसरपंच संतोष पाटील यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केला आहे
तालुक्यातील मौजे हिप्परगा (जाने ) ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच प्रदीप गारोळे उपसरपंच संतोष पाटील यानी गावच्या विकासासाठी प्रयत्न करीत गावची ग्रामपंचायत कार्यालय विकासाच्या दिशेने नेत असल्यामुळे सदरच्या गावात विविध विकास कामे दिसून येत असून सदरचे कामे करीत असताना मारुती मंदिराच्या समोर फेवर ब्लॉक दर्जेदार करण्यात आले होते
हिपरगा ग्रामपंचायत कार्यलयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या फेवर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे गावातील व्यक्तीनी तक्रार दिली होती परंतु सदरच्या कामाची चौकशी करण्यात यावी म्हणून जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे करण्यात आली होती
दिनांक ८ जुन २०२३ रोजी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यासाठी हिप्परगा गावात येऊन पाहणी केली असता सदरच्या ग्रामपंचायत कार्यालयाचा पारदर्शक कारभार असल्याचे अधिकाऱ्याला निदर्शनास आढळून आले आहे
हिप्परगा गावचे विद्यमान सरपंच प्रदीप विश्वंभर गारोळे व उपसरपंच संतोष पाटील हिपरगेकर आणि ग्रामसेवक मिलिंद जोंधळे व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य केवळबाई मारोतराव कदम तानाजी मारोती नरवाडे देऊबाई गणपती आलेवाड सुनिता संभाजी पवार शोभा संजय गारोळे यांच्या कार्यप्रणालीवर हिप्परगा गावात कामाची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे

0 Comments