राज्यातले सरकार कोणत्या ही पक्षाचे असो या सरकार कडून जनतेच्या सेवेसाठी व रुग्णासाठी मोठ मोठाले शासकीय दवाखाने बांधण्यात आले असले तरी ते शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दवाखाने रुग्णाविना बे वारस असल्याचे दिसून येत आहे
सन २०१९ मध्ये कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील नूतन इमारतीसाठी व जनतेच्या सेवेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून शासकीय दवाखान्याच्या इमारती बांधण्यात आल्या असताना सुद्धा अद्याप तरी रुग्णाच्या सेवेत देण्यात आल्या नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे
गुत्तेदाराच्या माध्यमातून इमारतीचे काम पूर्ण होऊन सुद्धा एक वर्ष पूर्ण झाले तरी आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे सदरच्या दवाखान्यात आत्ता पर्यंत शासनाकडून लायटिंग केली नसल्यामुळे सदरची नूतन इमारत ही रुग्णाविना वाऱ्यावर असल्याचे वास्तव चित्र बरबडा दिसून येत असून या दवाखानातील सर्व आरोग्य विभागाचे यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करीत असल्यामुळे रुग्ण थोडक्यात समाधान व्यक्त करीत आहेत
महाराष्ट्र शासन राज्यातल्या नागरिकांसाठी व जनतेसाठी शासकीय दवाखान्याच्या माध्यमातून मोफत सेवा देत असते आणि दुसरीकडे हे बे दखल दुर्लक्ष करीत असल्यामुळे शासनाच्या अंमलबजावणीला चांगलाच "खो "लागत असल्यामुळे अशा पद्धतीच्या कोठ्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नूतन दवाखान्याच्या इमारती रुग्णाविना आजारी आहेत
इमारतीमध्ये आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे लाइटिंग करण्यात आली नसल्याने बरबड्याच्या आरोग्य विभागाची नूतन इमारतअद्याप तरी शासनाने रुग्णाच्या सेवेत दिली नसल्यामुळे रुग्णाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील आरोग्य विभागाची इमारत नांदेडचे गुत्तेदार जोगदंड यांनी गेल्या वर्षी काम पूर्ण केले परंतु आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे सदरच्या दवाखान्यात शासना कडून लायटिंग करण्यात आली नसल्यामुळे येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी व रुग्णाला जुन्या इमारती मध्येच अधिकाऱ्यानी दवाखाना चालू ठेवला असल्याचे ही वास्तव चित्र बरबडा येथे दिसून येत आहे

0 Comments