नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तहसील कार्यालयाला नूतन महिला तहसीलदार म्हणून मंजुषा भगत यांनी आपल्या पदाचा कार्यभार दिनांक १७ जुन २०२३ रोजी स्वीकारला असल्यामुळे नांदेड जिल्हा तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी महिला तहसिलदार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन केले आहे
नायगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार गजानन शिंदे यांची बदली झाल्याच्या नंतर नांदेड येथून बदलीवर आलेल्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार मंजुषा भगत यांनी नायगावच्या तहसील कार्यालयात रुजू झाल्या आहेत
नांदेड जिल्हा तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या माध्यमातून आपल्या कार्यालयात रुजू झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचे आयोजन केले असल्याने सदरच्या कर्तव्यदक्ष महिला तहसिलदारांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे
तहसील कार्यालय नायगाव येथे तत्कालीन महिला तहसिलदार म्हणून सुरेखाताई नांदे यांनी सुद्धा ह्या तहसील कार्यालयाचा पदभार स्विकारला होता त्यांनी येथे कार्यरत असताना चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे
या तहसील कार्यालया मध्ये महिला कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून मंजुषा भगत रुजू झाल्या असल्यामुळे या नायगावच्या तहसील कार्यालयात आज पर्यंतच्या काळात दोन महिला तहसीलदार आल्या आहेत
नुकत्याच रुजू झालेल्या महिला तहसिलदार मंजुषा भगत यांनी या तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या संपूर्ण गावाकडे लक्ष देऊन उत्कृष्ट कामगिरी बजावतील अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे

0 Comments