Header Ads Widget

घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याचा अखेर वनवास संपला आमदार राजेश पवार यांच्या कार्यप्रणालीना यश ९ जुन रोजी तेरा कोटीचे उदघाट्न होणार निलेश देशमुख यांची माहिती !!

       माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याचा अखेर वनवास संपला असल्यामुळे  कार्यप्रणालीना अखेर यश प्राप्त झाले दिनांक ९ जुन २०२३ रोजी तेरा कोटी रुपयाचा उदघाट्न सोहळा बळेगाव येथे सकाळी ९ वाजता होणार असल्याची माहिती रुई बुचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी दिली आहे

तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रास्ता हा शासन दरबारी बेवारस होता परंतु आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी एकूण तेरा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला असल्यामुळे सदरच्या कामाचे उदघाट्न आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे रुई बु चे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी सांगितले आहे

घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याचे काम व उदघाटन आमदार राजेश पवार यांच्या हस्ते होत असल्यामुळे रुई बुचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख पवार यांचे अभिनंदन केले आहे 

सदरचा रस्ता हा जनतेला व नागरिकांना येण्या जाण्याची सदरचा रस्ता यापुढे योग्य ठरणार असल्यामुळे आमदाराच्या कार्यप्रणाली या भागातील जनता समाधान व्यक्त करीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments