माधव पवार
नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शानाखाली उपायुक्त महसूल डॉ पंजाब खानसोळे यांनी क्षेत्रिय कार्यालयांना मालमत्ता करवसुली वाढविण्यासाठी मागील वर्षातील कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यास नकार दिल्यास वसुलीसाठी कडक पावले उचले होते
वसुलीचे नियोजन करावे जप्तीची कारवाई करावी अशा सक्त सुचना दिल्या आहेत त्यानुसार क्षेत्रिय कार्यालय यांच्या नियंत्रणाखाली आज दिनांक २९ मे २०२३ रोजी कर भरणा करण्यास नकार दिल्याने क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत मालमत्ता क्रमांक ४०१०१२३०४३२ या मालमत्ते वर रु ११ लाख ९ हजार १२६ कर थकीत असल्याने संबंधित यांचे दुकान सिल करण्यात आले होते
क्षेत्रीय अधिकारी राजेश चव्हाण पथकातील विठ्ठल तिडके साहेबराव ढगे राजु जोरावर अजरोद्दीन रावसाहेब कोकाटे यांनी सहभाग नोंदविला होता क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत मालमत्ता क्र १.११-५६ या मालमत्ते वर रुपये ५४८२० / व १-१-८९ या मालमत्तेवर रक्कम ९५६४७ कर थकीत असल्याने दोन नळ खंडित करण्यात आले होते
क्षेत्रीय अधिकारी रमेश चावरे व पथकातील राहुल सिंह चौधरी, पुरूषोत्तम कामतगीकर, मेघराज जोंधळे,विजय मोडके,यांनी सहभाग नोंदविला होता क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ५ अंतर्गत ९-१-१-३२ या मालमत्तेवर ८१९१४ व मालमत्ता क्रमांक ९-१-१-२८ या मालमत्ते वर रुपये मालमत्ता क्रमांक ८-१-३३३ वर रुपये ११०९९९ कर थकीत असल्याने तीन्ही मालमत्तेचे तीन नळ खंडित करण्यात आले होते
क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे व पथकातील जी जी तोटावार, गुलाम दस्तगीर, कपील जोंधळे,शेख फारूख,रवी बनसोडे यांनी सहभाग नोंदविला होता या कारवाई आयुक्ताने अधिकची तीव्र करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या यामुळे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा ग्रामीण भागात होताना ऐकावयास मिळत आहे
महापालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी मागील वर्षाचा थकीत कराचा भरणा त्वरित करून महापालिकेस सहकार्य करावे आणि जप्तीची मलनिःसारण नळ खंडन या सारख्या सक्त कार्यवाई टाळाव्यात असे आवाहन उपायुक्त महसूल डॉ पंजाब खानसोळे यांनी केले होते
खरे तर जप्तीची कारवाई अधिक तीव्र करा म्हणाऱ्या आयुक्त डॉ सुनिल लहाने यांची तडकाफडकी बदली करण्यात आली तर नांदेडच्या नूतन आयुक्त म्हणून महेशकुमार डोईफोडे ? येणार आहेत

0 Comments