नायगाव तालुक्यातील वझर गाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच व उर्फ सरपंच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या दोन महिलांचा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने सदरील महिलेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असल्यामुळे महिला वर्गासाठी अभिमानाची बाब आहे
यत्र नार्यंतु पूज्यंते तत्र पूज्यंते देवता या उक्ती प्रमाणे वजीरगाव गावातील दोन आदर्श महिलांचा महिलाचा अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे यावर्षी पहिल्यांदाच हा महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत असून वजीरगाव येथील समाजिक क्षेत्रातील एक परखड व्यक्तिमत्व असलेल्या श्रीमती जमनाबाई धोंडीबा पाटीढगे व बचत गट क्षेत्रात धाडसी कर्तव्यवान असलेल्या सौ लक्ष्मीबाई शंकरराव पाटील ढगे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे
वाजीरगाव ग्रामपंचायतच्या गावच्या महिला सरपंच विद्यमान सौ.शांताबाई केरबा माने उपसरपंच विश्वांभर शेषेराव पाटील ढगे सेवा सहकारी सोसायटी चेअरमन माणिका रामकिशन पाटील ढगे,व्हाईस चेअरमन व्यंकटी पाटील ढगे तसेच ग्रामपंचायत व सोसायटी सर्व विद्यमान सदस्य आणि गावातील जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
अशा प्रेरणादायी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना खूपच ऊर्जा दायी प्रोत्साहन मिळेल अशा शब्दात उपसरपंच विश्वांभर पाटील व भाजपा कार्यकर्ते वैजनाथ पाटील ढगे यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे

0 Comments