कर्नाटक राज्यामध्ये भाजपाच्या साम-दाम-दंड-भेद ईडी सीबीआय या नीतीला जनतेने स्पष्ट नाकारले आणि काँग्रेस पक्षाच्या हाती स्पष्ट बहुमताने सत्ता दिली असल्यामुळे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सदरच्या विजयाचा जल्लोष करण्यात येत असून कर्नाटक राज्यात भाजपाचा जनतेनी व मतदारानी सफया करून कमळ कोमेजून टाकले आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यात नायगाव शहारात कर्नाटक विजयाचा आनंद दिनांक १३ मे २०२३ रोजी नायगाव शहरांमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देश कि आंधी राहुल गांधी देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाचा पराभव झालाच पाहिजे असे घोषणा देत फाटक्याची अतिबाजी करून दमदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे
कर्नाटक तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी असे विविध नारे देऊन जल्लोष साजरा करण्यात आला या जल्लोषा दरम्यान यावेळी माजी पंचायत समितीचे सभापती सय्यद रहीम शेठ माजी सभापती पंचायत समिती नायगाव विराज पाटील चव्हाण,पांडू पाटील चव्हाण शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी नायगाव) शरद भालेराव (माजी अध्यक्ष न.प नायगाव) संजय पाटील चव्हाण नगरसेवक प्रतिनिधी माणिक पाटील चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते
नायगाव शहरातील युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नायगाव हणमंत बोईनवाड नगरसेवक न.प.विठ्ठल आप्पा बेळगे (नगरसेवक न.पं.नायगाव साईनाथ चनावार ओबीसी सेल शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी नायगाव) फयाद सेठ (सरचिटणीस काँग्रेस) शकील प्रतिनिधी नगरसेवक शंकर पाटील चव्हाण,रामेश्वर गायकवाड, बालाजी शिंदे उपस्थित होते
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहून देशातील तमाम जनतेला लोकशाहीचा हक्क मिळून दिला त्याच बरोबर एका मताचा अधिकार धन दांडगा असो की गोरगरीब असो त्यांना संविधानात एका मताचा अधिकार दिला आहे
लोकशाहीतील लोकांनी व मतदाराने कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय करून दिला असल्याने सदरचा विजय हा लोकशाहीचा असल्याच्या घोषणा देत नायगाव शहरात कर्नाटक राज्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला आहे

0 Comments