कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेते राहुलजी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्या बद्दल नायगाव तालुका काँग्रेसचे मा.अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी तर्फे पेडे व गुलाल उधळून जोरदार नारेबाजीत जोशपुर्ण वातावरणात असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा केला आहेनायगाव तालुका काँग्रेसचे मा.अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन पाटील कोकाटे,शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे,शिवसेनेचे संघटक विजय मुंडकर अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सय्यद इसाकभाई,वसीम पटेल,सत्तार शेख जमीनदार,मधुकर ताटे,नजीरसेठ बागवान,जळबा गवळे आदी यावेळी उपस्थित होते तालुक्यातील बालाजी भिलवंडे,संदिप भिलवंडे,सुधारक भिलवंडे,सरपंच देवीदास राठोड,मा.सरपंच गोविंदराव बोयाळ,दशरथ ईरेवाड, हाजी शब्बीरशेट बागवान,सुधारक संत्रे, दिगंबरराव भुताळे, लालबा सुर्यवंशी, पत्रकार सय्यद अजीमभाई,अनिल बोधने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते
कर्नाटक राज्यात झालेल्या काँग्रेसच्या विजयाचा नांदेड जिल्ह्याच्या नायगावातील नरसी येथे सदरचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी राजेश लंगडापूरे अरीफ बागवान रावसाहेब वडजे सुनिल पाटील बालाजी पवार सुजीत जाधव बालाजी जाधव सय्यद मोइन इरफान,टिपु,शेख वाहेद आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या सह बहुसंख्येने नागरीक उपस्थित होतेकर्नाटक विजयाचा जल्लोष साजरा करताना संभाजी पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले भाजपा पक्षाने देशातील तुकडे तुकडे करून टाकून दिले असल्याने काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सर्व देशाचे झालेले तुकडे हे एकत्र करण्याचे काम केले राहुल गांधी यांनी केले आहे
कर्नाटक राज्यात येथील मतदार बांधवांनी आणि जनतेने काँग्रेस पक्षाला बहुमताने विजय करून दिल्या बद्दल कर्नाटक राज्याच्या जनतेचे जाहीर अभिनंदन व त्यांचे स्वागत केले आहे

0 Comments