Header Ads Widget

कुंटूरच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक राजपूत यांची बदली पालकांसह विद्यार्थ्यांत नाराजी बदली रद्द होईल का ? विद्यार्थी !!


माधव पवार / मारोती इबितवार 

नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूरचे मुख्याध्यापक राजपूत यांची बदली झाली असल्यामुळे जनतेसह पालकात व विद्यार्थ्यांत नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे

कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापकाची शिक्षण विभागाने बदली रद्द करावी असी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून सदरच्या मुख्याध्यापका कडून शिक्षणाचे धडे हे विद्यार्थ्यांच्या डोक्यात रुजवणारे व शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे कुंटूरचे मुख्याध्यापक राजपूत यांची नुकतीच बदली झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसह विद्यार्थीत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे

तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर या शाळेतील मुख्याध्यापक राजपूत यांची बदली शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे झाली का ? अनाधिकृत झाली असा सवाल ही जनतेतून केला जात असला तरी सदरच्या मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात येत असून सदरचे मुख्याध्यापक राजपूत यांनी काही वर्षाखाली मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये कार्यरत होते

त्यांच्या कार्यप्रणालीवर जनतेसह पालक आणि विद्यार्थी समाधान असल्याचेही जनतेतून बोलल्या जात आहे

शासकीय क्षेत्र कोणते ही असो त्या ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी चांगल्या प्रकारचे काम केल्याच्या नंतर जनसामान्यांच्या हृदयात रुजले जातात तशाच पद्धतीने अधिकारी असो की कर्मचारी असो त्यांचा निरोप समारंभ करीत असताना अनेकांच्या डोळ्यात काही आनंदाचे अश्रू येतात तर काही दुःखाचे अश्रू येत असतात असे अनेक उदाहरणं आहेत

तर काही जण हेच अधिकारी पाहिजे अथवा हाच कर्मचारी पाहिजे असा हट्ट धरतात तशाच पद्धतीने कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक राजपूत यांची बदली झाली असल्यामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसत असले  तरी त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी जनतेतून जोर धरित आहे 




Post a Comment

0 Comments