धर्माबाद : अनंतोजी कालिदास :-
धर्माबाद नगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे रत्नाळी येथील सर्व जनतेस अत्यंत आनंद होते की संपूर्ण गावकऱ्याचे आराध्य दैवत व कुलदैवत असलेल्या श्री ग्रामदेवता पोचम्मा व आडेली पोचम्मा माता नवीन जीणौद्धारांचे बांधकाम पूर्ण पणे झाले आहे
येत्या शुक्रवारी दिनांक १२ मे २०२३ रोजी मंदिरात ग्रामदेवता पोचम्मा व आडेली पोचम्मा माता नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कळशा रोहन सोहळा सर्व गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे
पौर्णिमा जिनिंगच्या समोरील भागात श्री द्रोपदी माता मंदिराच्या बाजूला असलेली श्री ग्रामदेवता पोचम्मा व आडेली पोचम्मा मातेची मंदिर असून या मंदिराची परंपरा शेकडो वर्षाची आहे
रत्नाळी गावात कुठलेही नवीन कार्य असू द्या ग्रामदेवता पोचम्मा आडेली पोचम्मा व द्रोपदी मातेला प्रसाद चढविल्याशिवाय नवीन कार्य केला जात नाही अशी ही नवसाला पावणारी माता असल्याची गावकऱ्यांच्या धार्मिक भावना असून गावकऱ्यांच्या लोक सहभागातून ग्रामदेवता पोचम्मा व आडेली पोचम्मा जुने असलेले मंदिर पाडून त्या ठिकाणी देखणे असा अतिशय सुंदर असा नवीन मंदिराचे बांधकाम सर्व गावकऱ्यांच्या लोक वर्गणी सहभागातून करण्यात आला आहे.
सविस्तर असे कि कार्यक्रमाची गावकऱ्यांच्या वतीने अशा प्रकारे रूपरेषा ठरलेल्या आहे यज्ञ ब्रह्म श्री बालाजी शर्मा यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळस रोहन पुढील प्रमाणे दि १० मे २०२३ रोजी बुधवार सकाळी ८ वाजून मिनिटानी संध्याकाळी ६ वाजून ३० वाजता मूर्ती जलाभिषेक ओम महाआरती तीर्थप्रसाद वितरण करण्यात येत आहे
दिनांक ११ मे २०२३ रोजी गुरूवार सकाळी ८.३० ते सं.६.३० महाआरती व तीर्थप्रसाद वितरण दि.१२/५/२०२३ रोजी शुक्रवार सकाळी ८.०० ते ८.३० श्री गणपती पूजन, गर्तान्यास ग्रामदेवता पोचम्मा आणि आडेली माता यंत्र प्रतिष्ठा, हवन होम, दुर्गा हवन,कलानिहास हवन बलीप्रदान महापुरणाऊती महाआरती तीर्थप्रसाद वितरण करण्यात आले आहे
या कार्यक्रमास धर्माबाद तालुक्यातील सर्व जनतेने व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन रत्नाळी येथील समस्त गावकऱ्यांच्या व पोचम्मा माता समितीच्या वतीने करण्यात येत असून रत्नाळी येथील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की आपण आप आपल्या बाईलेकीना कळशारोहन सोहळ्याच्या भव्य कार्यक्रम कळवुन वर्गणी जमा करण्यास सांगण्यात यावे असे आवाहन पोचम्मा माता समिती व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे
पोचम्मा आणि आडेली पोचम्मा माता मूर्तीचे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशा रोहन सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे पोचम्मा माता समिती रत्नाळी व सर्व गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे

0 Comments