Header Ads Widget

डिसिजन राजेश देशमुख कुंटूरकर यांच्याकडे थोरल्या दाजी आणि भाऊजी मध्ये कुंटूर मार्केट कमिटीचा सभापती कोण ? उपसभापती म्हणून मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या नावाची चर्चा !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत भाजपा पक्षाचे राजेश देशमुख कुंटूरकर व काँग्रेस पक्षाचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांची सदरच्या निवडणुकीमध्ये युती झाली असल्याने कुंटूरकर गटाचे १० तर चव्हाण गटाचे ८ उमेदवार मार्केट कमिटीच्या निवडणुकीत निवडून आले आहेत

तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीवर आत्ता दाजी आणि भाऊजी मध्ये सदरच्या मार्केट कमिटीचा सभापती कोण ? असा प्रश्न चर्चेला जात असला तरी सदरचे डिसिजन विद्यमान राजेश देशमुख कुंटूरकर यांच्याकडे असून त्या मार्केट कमिटीचा नूतन उपसभापती म्हणून मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या नावाची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकी मध्ये काँग्रेस व भाजप एकत्र येऊन सदरची निवडणूक लढविल्यामुळे सदरच्या मार्केट कमिटीवर भाजप व काँग्रेसची सत्ता असणार आहे

माजी मंत्री तथा खा स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई व राजेश देशमुख कुंटूरकर व रुपेश देशमुख कुंटूरकर यांचे बरबडा नगरीचे विद्यमान सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत अतिशय परिश्रम घेतले आहे

काँग्रेस व भाजप एकत्र करण्यासाठी प्रयत्न करणारे आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या लाडक्या मेहुण्या कडून सभापती पदाची संधी मिळाल्यास ते कुंटूर मार्केट कमिटीचे सभापती होऊ शकतात असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 

माजी मंत्री पुत्र तथा कुंटूर नगरीचे भाजपा पक्षाचे राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या दाजीचा तोडगा काढण्यासाठी अंतिम डिसिजन कुंटूरकर यांच्याकडे असला तरी सध्याच्या परिस्थितीत दाजी आणि भाऊजीच्या मध्ये कुंटूर मार्केट कमिटीचा सभापती कोण ? असी चर्चा होताना ऐकावयास मिळत असून उपसभापती म्हणून मनोज पाटील मोरे टाकगळीकर यांच्या नावाची चर्चा असून या निवडणुकी दरम्यान बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्यासह प्राचार्य मनोहर पवार मोठे परिश्रम घेतले आहे  

Post a Comment

0 Comments