Header Ads Widget

मौजे सिबदरा येथील दोन नव तरुण युवकाचा मोटार सायकल व महिंद्रा ब्लॉरो पिकपच्या अपघात एक जण जाग्यावर ठार तर दुसऱ्याचा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू :


हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिमायनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे सिबदरा येथील रहिवासी असलेल्या दोन नव तरुण युवकांचा राष्ट्रीय मार्गावर असलेल्या मौजे वडगाव येथे हनुमान मंदिराच्या जवळ मोटार सायकल व महिंद्रा ब्लॉरो पिकप या वाहनाच्या धडकेत एक जण जाग्यावर ठार झाला तर दुसरा नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे

तालुक्यातील हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हदीत हा सदरचा अपघात घडला या गोपाळ माधव बाचकलवाड वय वर्ष ४२ यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा देविदास बालाजी गोसलवाड वर्ष २५ हा गंभीर असल्यामुळे त्याना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते आहे

सिबदरा येथील सदरील घटनेचे सविस्तर व्रत असे की मोटार सायकलवर प्रवास करणारे गोपाळ माधव बचक्कलवाड व दुसरा देविदास बालाजी गोसलवाड वय २५ वर्ष हे दोघे जण हिमायतनगर येथून सायंकाळी आपल्या सिबदरा गावाकडे मोटर सायकलने जात होते 

सदरचे दोघे जण मौजे वडगाव येथील हनुमंत रायाच्या मंदिरा जवळ येताच मोटार सायकल व महिंद्रा ब्लॉरो पिकपची जब्बर धडक बसली असल्यामुळे या झालेल्या अपघात गोपाळ माधव बचकलवाड वय ४२ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा या अपघातात गंभीर जखमी झाला असल्यामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले 





Post a Comment

0 Comments