नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील काहाळा ते गडगा सोमठाणा महामार्गावरच्या बाजूने ऑगस्ट महिन्यात सामाजिक वनीकरण विभागांच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमणात वृक्षांची लागवड केली आहे
सदरच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्याला झाडाचे संरक्षण करण्यासाठी गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात सदरच्या झाडाभोवती झाडाला संरक्षण मिळावे म्हणून काटेरी कुंपण लावले असल्याचे वास्तव चित्र सदरच्या रस्त्यावर दिसून येत आहे
तालुक्यातील काहाळा गडगा सोमठाणा जाणाऱ्या रोडच्या बाजूने सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्याने पावसाळ्यात झाडे लावले आणि त्या झाडाला संरक्षण म्हणून कुंपण लावण्यासाठी कडाक्याच्या उन्हाळ्यात अधिकाऱ्याना जाग आली असल्याचे सदरच्या लावलेल्या झाडाला काटेरी कुंपणावून दिसून येत आहे
सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात कडाक्याच्या उन्हागळा पडला असताना सामाजिक वनीकरण विभागांच्या मार्फत लावलेले कुंपण आता कोणत्या कामाचे असाही प्रश्न जनसामान्य माणसातून केला जात असला तरी प्रशासन कुठे वृक्ष लागवडीच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत असल्याचे ही जनतेतून बोलल्या जात आहे
सोमठाणा काहाळा गडगा या सदरच्या मार्गावर लावण्यात आलेल्या कुंपणाचा सदरील झाडाला फायदा कडाक्याच्या उन्हाळ्यात होऊ शकतो का ? असा प्रश्न जनतेतून केला जात असला तरी सदरच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्याला उन्हाळ्यातच कशी जाग आली असा ही प्रश्न ग्रामीण भागातील जनसामान्य माणसाला भेडसावत आहे

0 Comments