Header Ads Widget

निळेगव्हाण येथे शेतातील बोअर चालू करण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू : कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना !!

               माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे निळेगव्हाण येथे एका शेतकऱ्यांनी शेतातील बोअर चालू करण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्यांचा शॉक लागून जाग्यावर मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक १४ मे २०२३ रोजी अंदाजे ३ ते ४'वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे बिट जेमादार संतोष कुमरे यांनी माहीती दिली आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मौजे निळेगव्हाण येथे एक गरीब शेतकरी आपल्या शेतात नवीन बोअर मारून काहीतरी लागवड करण्याच्या उद्देशाने काम करीत असताना त्यांच्या कुटुंबीयांवर वेगळेच संकट कोसळले आहे

निळेगव्हण येथील मयत शेतकरी  अप्पाराव बाबुराव पाटील जाधव वय ४५ यांनी सदरच्या बोअर मधील मोटार करण्यासाठी स्टार्टरकडे गेला असल्यामुळे विजेचा शॉक लागून जागीच ठार झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

निळेगव्हाण येथील शॉक लागून मृत्यू पावला असल्याची माहिती कुंटूर पोलिसाना मिळताच कुंटूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष कुंबरे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल अशोकराव घुमे यांनी सदरील घटनेचा पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले आहे

सदरच्या प्रेताचे शवविछेदन करण्यासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्याची सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments