नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील मौजे पाटोदा बु येथे काँग्रेस पक्षाचे शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या विशेष उपस्थितीत दिनांक २६ मे २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजण्याच्या दरम्यान गावकऱ्यांनी शेतकरी मेळाव्याच्या आयोजन केले असून या सदरचे भव्य मेळाव्यात शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी शेतकऱ्यासह तरुण वर्गाला सदरच्या मेळाव्यात विशेष मार्गदर्शन करणार आहे
धर्माबाद तालुक्यातील पाटोदा बु येथील गावकऱ्यांच्या वतीने शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले या सदरच्या मेळाव्यासाठी धर्माबाद उमरी नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यासह तरुण वर्गानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून शेतकरी माय बापाने उद्योगांच्या माध्यमातून आपले उत्पन्न कसे वाढवावे आणि तरुण वर्गाने उद्योग धंद्याकडे वळले पाहिजे हा डोळस विचार समोर ठेवून शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे
तालुक्यातील पाटोदा बु सदरच्या विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे या सदरच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगाव विधानसभा मतदारसंघात काम करत असलेले व उमरी तालुक्यांसह नायगाव धर्माबाद तालुक्यातील जनतेशी नाळ जोडलेले शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी सदरच्या मेळाव्यात शेतकऱ्यांना व तरुण वर्गाला मार्गदर्शन करणार आहेत

0 Comments