Header Ads Widget

प्रशासनाचा तलाठी नदीत बुडाल्याच्या नंतर महसूल प्रशासनाला आली जाग वाळू माफियांना पकडण्याच्या नादात गेला जीव


नायगाव फास्ट न्यूज : परभणी / सेनगाव := 

परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून वाळू माफियाला पकडण्यासाठी गेलेल्या प्रशासनातील तलाठ्याचा नदीत बुडून अंत झाल्याच्या नंतरच महसूल प्रशासनाला जाग आली असून सदरची घटना ही पूर्णा नदीपात्रातील सेनगाव तालुक्याचा हिंगोलीच्या हद्दीत लिंबाळा हुडी  हद्दीत घडली असल्याचे सांगण्यात येते आहे

जिल्ह्याच्या पूर्णा नदी पात्र हे तालुका सेनगाव पर्यंत असल्यामुळे या नदीवर वाळूचा उपसा होत असल्यामुळे तो थांबला या हेतूने तलाठी नदीत उतरला असल्याचे सांगण्यात येते मात्र तलाठी पोहताना दम आल्याने तो पाण्यात बुडाला असल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली असून रात्रीच्या वेळी पूर्णा नदीपात्रात या तलाठीचं शोध सुरु घेण्याचे काम चालू होते

धक्कादायक घटना कळताच पोलीस प्रशासनासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी रवाना झाले कर्तव्यावर असलेले तलाठी सुभाष होळ असे नाव असल्याचे सांगण्यात येते परंतु प्रशासनातील तलाठी  नदीत बुडून मृत्यू पावल्याच्या नंतरच महसूल प्रशासनाना जाग आली आहे 

सदरील घटनेच्या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार २५  मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परभणीच्या जिंतूर तालुक्यातील डिग्रस मधील वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तलाठी सुभाष होळ धनंजय सोनवणे पोलिस पाटील घटनास्थळी गेले होते मात्र त्या ठिकाणी जिंतूर तालुक्याच्या हद्दीत वाळू उपसा बंद असल्याचे दिसून आले आहे 

नदीच्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्याच्या हद्दीत वाळू धक्का सुरू होता तसेच या ठिकाणी दोरीच्या साह्याने वाळू उपसा सुरू असल्याचे तलाठी सुभाष होळ यांना दिसल्यामुळे तलाठी सुभाष होळ यांनी पाण्यात उतरला पोहत जात असताना काठावर जाण्याचा प्रयत्न केला परंतु मध्येच बुडून जिव गमावला आहे 







Post a Comment

0 Comments