Header Ads Widget

ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यासह गुत्तेदाराच्या हलगर्जीपणा विहिरीचे खोदकाम केले - "अन "बांधकाम कधी ? पावसाळ्या पूर्वी करा -

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील ग्रामपंचायत कार्यालयाची कसल्याच प्रकारची आडचण नसताना सुद्धा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नायागांवच्या अधिकाऱ्यासह नांदेडच्या गुत्तेदारा कडून कामाची गती वाढविण्या ऐवजी कामाची गती मंदावली असल्याने यात अधिकाऱ्याचा व गुत्तेदाराचा हलगर्जी दिसत असल्यामुळे सदरच्या विहीरीचे खोदकाम करण्यात आले

रुई येथे जल जीवन मशीन अंतर्गत करण्यात आलेल्या विहिरीच्या पाण्यात १३ ते १४ आणि १५ वर्षाच्या वयोगटातील मुलं त्या विहिरीत पोहत असल्याने काही  अनुचित प्रकार होऊन जीवित हानी झाल्यास त्याला  जबाबदार कोण ? असा ही प्रश्न चर्चेला जात असला तरी सदरच्या गुतेदारांनी तात्काळ विहिरीचे काम पूर्ण करावेत अशी मागणी होत आहे 
रुई बु येथील विहिरीचे बांधकाम कधी असा स्पष्ट प्रश्न नागरिकातुन केला जात आहेतालुक्यातील रुई बु ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ प्रिंयका निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या तीन ते चार महिन्याखाली केले होते परंतु या योजनेचे पाणी गावाला मिळावे असी अपेक्षा सर्वाना आहे

सदरच्या जल जीवन योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावासाठी यासाठी गावचे ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व सदस्य प्रयत्न करत असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नायगाव यांच्यासह गुत्तेदाराच्या निष्काळपणामुळे विहिरीचे बांधकाम करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहेरुई बु येथील जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येत असलेले काम हे एका कोठी चौतीस लाख रुपयापेक्षा जास्तीचे असताना सुद्धा गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्यानी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्यामुळे सदरच्या विहिरीचे बांधकाम व टॉकीचे काम पावसाळ्या पूर्वी होईल असे नागरिकांना वाटत आहेसंबंधित गुत्तेदार करण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे

सदरच्या विहिरीचे बांधकाम पावसाळ्याच्या अगोदर केले तर योग्य ठरेलं कारण सदरच्या विहीरीचे खोदकाम एका पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी करण्यात आले ते बुजून जावू शकते ही बाब नाकरता नसल्याचे नागरिकातुन बोलल्या जात आहे

Post a Comment

0 Comments