नायगाव तालुक्यातील नावंदी येथील एका तरुणाने मोबाईलच्या अति नादातट्विटर वरून चक्क मुंबई उडवून देण्याची धमकी दिल्याने ,मुंबई पोलीस यांच्या सूचनेवरून नांदेडची पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली,व नांदेड पोलीस व मुंबई पोलिसांनी शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे
मुंबई पोलीस नायगावला येईपर्यंत नायगाव पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले, पोलिसांचा जीव भांड्यात पडला. अधिक चौकशी करण्यासाठी त्या तरुणाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती नायगावचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
नायगाव तालुक्यातून दोन दिवसापुर्वी एकाने ट्विटरवरुन चक्क मुंबई उडवून देण्याची धमकी दिली होती. या खळबळजनक प्रकारामुळे मुंबई पोलीस खडबडून जागी झाली आणि धमकी देणाऱ्याचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली
सदरील घटनेची अधिक माहिती मध्ये तो तरुण व्यक्तीने फेक आय डी वरुन मेसेज केल्याचे लक्षात आले. त्यानंतर कसून तपास केला असता धमकी देणारी व्यक्ती नायगाव तालुक्यातील नावंदीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
मुंबई पोलिसांनी सदरची माहिती नांदेड व नायगाव पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीवरून नायगाव पोलिसांनी तालुक्यातील नांवदी येथील श्रीपाद कमलाकर गोरठकर वय २० वर्ष या तरुणास सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे
नावंदीचा धमकी देणारा तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर नांदेडचे एटीएसचे अधिकाऱ्यांनी नायगाव येथे धाव घेतली. मंगळवारी पहाटे मुंबई गुन्हे शाखेचे पथक नायगाव शहरात दाखल झाले. कायदेशीर सोपस्कार पुर्ण करुन त्या तरुणाला अधिक चौकशीसाठी मुंबईयेथे घेवून गेले आहेत.

0 Comments