भाजप ज्येष्ठ नेते तथा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजकीय खेळीनेच नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी शिवराज पाटील होटाळकर यांची वर्णी लागली असून होटाळकर हे काँग्रेसच्या कोठ्यातून सभापती नाही तर भाजपच्या कोठ्यातले उपसभापती झाल्याने याचे सर्व श्रेय खा चिखलीकरनाच जाते
त्यामुळे फुकटची प्रसिद्धी अन्य पुढाऱ्यांनी घेऊ नये असे रोखठोक मत नुतन उपसभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी बोलताना सांगितले
नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आता पर्यंत भाजप ला एकाही जागेचे स्थान मिळाले नसताना खा.चिखलीकर यांनी राजकीय तडजोडीत सहा जागा व उपसभापती पद भाजप कडे घेतले आहे
उपसभापती पदी शिवराज पाटील होटाळकर यांची वर्णी लावून खासदार चिखलीकरांनी आपली राजकीय खेळी यशस्वी केली.खा.चिखलीकर यांनी निवडीसाठी मोलाची भूमिका बजावली. नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसच्या कोठ्यातून श्रीनिवास पा. चव्हाण यांची निवड झाली आहे
भाजप च्या शिवराज पाटलांना इतरांनी उपसभापती केले म्हणणे म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला डावळून केले असा अर्थ होते.
कुंटुर बाजार समिती विलीनीकर होणार या भीतीने दोन्ही कट्टर विरोधी भाजप व काँग्रेस यांनी शेवटच्या क्षणात सात डझनच्या वर उमेदवारांची माघार घेत बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली कुंटुर बाजार समितीत राजकीय तडजोडीत भाजप कडे सभापती पद तर काँग्रेसला उप सभापती देण्यात आले
याच प्रमाणे नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस कडे सभापती पद तर उपसभापती ठरल्या प्रमाणे भाजप ला देण्यात आले.शब्द काँगेस व भाजप या दोहोंच्या वतीने पाळण्यात आला असून खा. चिखलीकर यांच्याच पुढाकारातून भाजप ला सत्तेत वाटा मिळाला आहे
बाकीचे राजकीय पदाधिकारी यांनी याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असून ही राजकीय तडजोड असल्याने शिवराज पाटील होटाळकर हे भाजपचे खासदार चिखलीकर यांच्या आदेशानेच निवड झालेले उपसभापती असल्याचा दावा भाजप च्या जेष्ठ जिल्हा पदाधिकारी यांनी केला आहे.

0 Comments