तालुक्यात हदगाव सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालया कडून रोपे लागवड करुन येथील योजनेवर लाखो रुपये खर्च दाखवुन वृक्षारोपण योजनेला हरताळ फासला असून,भर उन्हाळ्यात रोपे लागवड केली जात आहे
तत्कालीन वनमंत्री मा.ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मागील काळात उपवनसंरक्षक प्रादेशिक वन विभागआणि विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग नांदेड जिल्ह्यातील गावात २/३/५/७/१०/२०/३३ कोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली होती
झाडे जगली,तर मानव प्राणी जगेल, आणि मानवाला शुद्ध,हवा,पाणी मिळेल, अशी गोड आशा बाळगुनच ही प्रभावी योजना त्यांनी सुरु केली.परंतु प्रशासनातील झारीच्या शुक्राचार्याने या प्रभावी योजनेच्या उद्देशाला महा भ्रष्टाचाराने मुळापासूनच कीड लावली होती.कोलदांडा प्रत्यक्षात थोडेफार,फोटो शेसन पुरते वृक्षारोपण करून बाकी कागदावरच वृक्ष लागवड होत,असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते.
दरवर्षी तालुक्यात हजारो रोपांची लागवड केलीअसल्याचे कागदोपत्रीच दिसुन येते,परंतू प्रत्यक्षात वृक्ष लागवड होत नाही. आणी लागवड केलेल्या वृक्षाचे काटेकोरपणे संगोपन ही केले जात नसल्याने,या प्रभावी योजनेला मोठा हरताळ फासल्या जातआहे.दरवर्षी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधीचा चुराडा योजनेवर खर्च होतो आहे.परंतू प्रत्यक्षात कुठलाच हेतू साध्य होत नसल्याचे स्पष्टपणे चित्र दिसून येत आहे
गेल्या महिन्यात तालुक्यातील मौजे पारवा खु.ते पोटा खु.आणि संपूर्ण तालुक्यात शेकडो ठिकाणच्या भागात फेब्रुवारी,मार्च, एप्रिल,मे उन्हाळ्यातच वृक्ष लागवड केलीअसल्याचे सोशल मीडियावर चित्र झळकले होते.ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून कुंपनच शेत खात असल्याची चर्चा मोठ्या चवीने केली जात आहे
हदगाव येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालय येथून चालणाऱ्या रोपे लागवड योजनेवर गेल्या पंचवार्षिक काळात पन्नास ते शंभर कोटी रुपयांचा जवळपास अनाठायी खर्च झाला असल्याचा कागदोपत्रावरिल नोंदी वरुन दिसुन येवुन ही संबंधित विभागीय वनाधिकारी व सहाय्यक वनसंरक्षक यांचे आरएफओ,वनपाल कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने हा सर्व काही प्रकारअलबेल चालूआहे.या बाबीकडे संबंधित विभागांच्या वरिष्ठांनी तात्काळ लक्ष केंद्रित करावे
करून या ठिकाणी एका सक्षम अधिकाऱ्यांमार्फत जायमोक्यावर जावुन खातेनिहाय सखोल चौकशी करन दोषींवर बडतर्फीची कायदेशीर कारवाई होणे गरजेचीआहे.अशी मागणी विविध सामाजिक राजकीय संघटना सह,वनप्रेमी नागरिकांतुन वांरवार मागणी पुढे आली आहे
अद्याप कोणतीही ठोस कारवाई न होता,असे अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवुन वरिष्ठ अधिकारी हे वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपरिमंडळ अधिकारी यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन गैरव्यवहार करण्यासाठी मुभा दिली जाते आहे.यामुळे तालुक्यातील अनेक गावातील साईटवर कोटींच्या कोटी रुपयांचे कामे दाखवुन महा भ्रष्टाचार होताना दिसतआहेत.दोषी आढळल्यास कारवाई कधी होणार? असेही वनप्रेमी नागरिकांतुन चर्चा सुरु आहे.
तालुक्यातील पळसपुर शिवारातील ५ एकर मध्ये लावण्यात आलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीची जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून सबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी... अशि मागणी जोर धरू लागली आहे

0 Comments