Header Ads Widget

मोटार सायकलवर का घेऊन नेला नाही म्हणून झालेल्या भांडणात कुंटूर पोलीस ठाण्यात रुई खुर्दच्या दोघा विरोधात ॲट्रॉसिटी दाखल - आरोपी अटक -

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रुई खुर्द येथे एका शुल्लक कारणा वरून झालेल्या भांडणां मध्ये तू मला मोटर सायकलवर का ?  बसून घेऊन गेला नाहीस म्हणून जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात सुवर्णाच्या दोघा जना विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती बीट जेमादार संतोष कुमरे यांनी दिली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रुई खुर्द या गावातील रहिवासी असलेले पंडित श्रीराम आटाळकर यांच्यासह सकाराम गणपत नरंगले यांनी फिर्यादी संतोष आनंदराव पवार यांना तुझ्या मोटर सायकलवर आम्हाला का ?  बसून घेऊन गेला नाहीस म्हणून जातिवाचक शिवगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरण संतोष पवार यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून रुई खुर्च्या दोघा जणांना विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेकुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई खुर्द येथे घडलेल्या घटनेततील सविस्तर माहिती अशी की संतोष आनंदराव पवार यांनी यांच्या दुकाना समोर चष्मे काढून बसले असता गावातील पंडित श्रीराम आटाळकर यांनी संतोष पवार यांना चष्म्याचे दुकान लावले की काय असा प्रश्न केला असता सदरच्या संतोष पवार यांनी माझ्या सोयऱ्याच्या समोर माझा अपमान केला आहे

रुई खुर्द येथील आटाळकर व पवार यांच्यात झालेल्या भांडणामुळे कॉलर धरून थापड बुक्यांनी मारहाण करून घेतल्याची चर्चा असली तरी दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली असली सदरच्या कुंटूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी प्रकरणाला चांगलाच उत्त आला असल्याची चर्चा ही रंगात असून सदरील घटनेचा तपास पुढे चालू आहे 




Post a Comment

0 Comments