नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील व बरबडा केंद्रा अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्रथमिक शाळा रुई बु येथील शाळेचे मुख्याध्यापक आर जी कोठेवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार सदरच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक बी जी बासटवार आणि सहशिक्षिका सौ एस जी गंदलवाड यांनी प्रयत्न करीत चालू वर्षातील पहिल्या वर्गाचा प्रवेश पूर्ण झाला असल्याची माहिती मुख्याध्यापक यांनी सांगितले आहेजिल्ह्यातील नायगाव तालुका शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असल्यामुळे जिल्हा परिषदच्या मुखकार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांच्या आदेशानुसार शाळेच्या माध्यमातून हर घर नर्सरी अर्थात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना केल्यामुळे मुख्याध्यापक आर जी कोठेवाड यांनी येत्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकानी सांगितले आहे
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु इयत्ता सातवी पर्यंत असल्यामुळे अतिशय सुंदर शाळा आणि शाळेत वृक्ष सृष्टी रम्यमय शाळा असल्यामुळे या शाळेचा आदिक दर्जा सुधारण्यासाठी दोन ते तीन शिक्षकाची गरज भासत असल्यामुळे जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर यांनी गंभीर्याने लक्ष घालून निदान दोन शिक्षक द्यावेत अशी मागणी गावकऱ्यातुन केली जात आहे
तालुक्यातील पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नंदकुमार काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बरबड्याचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख रेडेवार यांच्या सुचने नुसार केंद्रीय मुख्याध्यापक गुंठे यांनी सुद्धा ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासकीय शाळा असो की खाजगीशाळा असो यांच्या कडे सुद्धा जास्तीचे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरित आहे
रुई बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई बु येथे पहिल्या वर्गाचा प्रवेश पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक कोठेवाड यांच्यासह बासटवार सौ गंदलवाड यांनी कडाक्याच्या उन्हात घरो घरी जाऊन पालकाच्या भेटी घेऊन प्रवेश पूर्ण केल्याची माहिती रुई बु येथील शाळेनी दिली आहे

0 Comments