भारतीय स्वतंत्र्याच्या काळापासून म्हणजे गेल्या सत्तर वर्षापासून देशावर काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाने देशाला लुटले तर भाजपाने गेल्या नऊ वर्षापासून देशात काय दिवे लावले असा रोखठोक सवाल जनतेने व्यक्त केला असून काँग्रेस पक्षाने लुटले म्हणून तर भाजपा पक्षाला जनतेने सत्तेत आणले असून भाजपाच्या राजवटीत जनसमान्य जनता महागाईच्या भडक्यात भाजून निघाली असल्याने हैराण होताना दिसून येत आहे
भाजपा पक्षाच्या राजवटीत तमाम जनतेला जे सरकारच्या वतीने आश्वासन दिले होते ते अद्याप तरी पूर्ण झाले का ? असा सवाल जनसामान्य माणसातून केला जात आहे
देशातला काळा पैसा कुठे ? गेला जनधन खात्यात १५ लाख रुपये टाकण्यात येणार होते त्यांचं काय झाले देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दरवाढ झाली गॅसचे भाव गगनाला भिडले सुशिक्षित बेरोजगाराच्या मेगा भरतीचे काय ? झाले नौकर भरतीचे काय ? असे अनेक सवाल जनतेतून उपस्थित केले जात आहेत
काँग्रेस पक्षाने देशाचे वाटोळे व विकास केला नाही नाही म्हणून म्हणून तरी देशाची सूत्रे भाजपाच्या हत्ती जनतेने दिले काँग्रेस तसे म्हणून भाजप असे का ? असा सवाल केला जात आहे
देशाच्या भाजप राजवटीत दोनदा नोटबंदी करण्याचे निर्णय घेण्यात आले त्या नोट बंदीमुळे काळा पैसा देशाच्या हितासाठी देशात आला का ? असे अनेक प्रश्न जनसामान्य माणसाला भेडसावत असून त्याच बरोबर कोरोना महामारीच्या नावाखाली गेले दोन ते अडीच वर्षे जनसामान्य माणसावर उपासमारीची वेळ आली होती तेव्हा पासून या देशातील जनता आर्थिक चणचणीत असल्याचे सुद्धा शेतकऱ्यांसह जनतेतून रोखठोक सवाल केला जात आहे
काँग्रेस पक्षाने या देशाला सत्तर वर्षे लुटले म्हणून तर भाजपाला जनतेनी सतेत आणले व भाजपाच्या राजवटीत नऊ वर्षात काय दिव्ये लावले असा सवाल जनतेनी केला आहे
आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लागत असल्याची चाहूल लागत असल्यामुळे मतदाराकडे कोणत्या शब्दानी मतदान मागणार आहात हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे

0 Comments