Header Ads Widget

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर देगाव येथे समान जागा तर घुंगराळा येथे वसंत पाटील सुगावे यांच्या गटाचा दुसऱ्यांदा धुवाधार विजय !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील देगाव व घुंगराळा येथे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचे दिनांक १८ मे २०२३ रोजी मतदान झाले या निवडणुकीत देगाव येथे डॉक्टर दत्ता मोरे यांच्या बाजूने एका जागेचा निकाल लागला तर रावसाहेब पाटील यांच्या बाजूने एका जागेचा निकाल लागेल्यामुळे येथे मतदारानी समान जागा निवडून दिल्या आहेत तर घुंगराळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या गटाचा दुसऱ्यांदा विजय झाल्याचे व्रत आहे 
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे या पूर्वी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा गावचे आणि पॅनल प्रमुख वसंत पाटील सुगावे यांच्या गटाचे १३ उमेदवार विजयी झाले होते त्या पाठोपाठ ग्रामपंचायत कार्यालयाच्या वार्ड क्रमांक २ निकाल जाहीर झाल्याच्या परत एकदा वसंत पाटील सुगावे यांचा गटाचा विजय झाल्यामुळे फाटक्याची अतिषबाजी करण्यात आली तर कुंटर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका कुमरे यांनी ए एस आय निकम व पोहेका कंधारे यांनी चौक बंदोबस्त ठेवला आहे 

 घुंगराळा येथे  पॅनल प्रमुख साहेबराव माली पाटील आणि वसंत पाटील सुगावे यांनी सेवा सहकारी सोसायटी बरोबर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोट निवडणूकी दरम्यान आमने सामने होते या दोन्ही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या गटाचा दुसऱ्यांदा पराजय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसऱ्यांदा विजय झाला असून सदरच्या निवडणूका अतिशय अटी तटीच्या झाल्या होत्या असे वास्तव चिट दिसून आले आहे 

देगाव येथील ग्रामपंचायत पंचायतच्या पोट निवडणुकीत डॉ दत्ता मोरे -गटाचे उमेदवार वार्ड क्रमांक ३ मधून  प्रऱ्या गबाई रावण भंडरवाड विजयी झाले तर रावसाहेब महोनराव पाटील मोरे यांच्या गटाचे स्वतः उमेदवार रावसाहेब महोनराव पाटील वार्ड क्रमांक २ मधून निवडून आले आहेत तर घुंगराळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वसंत पाटील सुगावे यांच्या गटाच्या रुक्मिणीबाई गोविंदराव पांचाळ  ह्या प्रचंड मतांनी वार्ड क्रमांक दोन मधून विजयी झाल्या आहेत 

देगाव येथे समान जागा तर घुंगराळा येथे वसंत पाटील सुगावे यांच्या गटाचा दुसऱ्यांदा विजय झाला 
आहे 

Post a Comment

0 Comments