Header Ads Widget

अन्नदान रक्त दान मतदान हे सर्व श्रेष्ठ दान करणे काळाची गरज - जेष्ठ शिक्षक एन टी सर बरबडेकर यांची प्रतिक्रिया

        माधव पवार
या भारत भूमीतील अतिशय महत्त्वाचे दान असलेले म्हणजे एक रक्तदान दोन अन्नदान तिसरे मतदान हे अतिशय मोलाचे दान असल्यामुळे अनेकांना ह्या दानाचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो रक्तदानाच्या माध्यमातून मानव धर्मातील लोकांचा जीव धोक्यात असल्यास व रक्तांची गरज असल्यास या देशातील रक्तदाते रक्तदान करून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवतात असे काम ग्रामीण भागातून जर पाहिले तर बरबडा येथील एनटी सर यांच्या माध्यमातून महत्त्वाचे काम घडत आहे

या देशात भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लहान असो की मोठा असो त्याला एका मताचा अधिकार दिल्यामुळे त्या मतदानाच्या माध्यमातून या देशाचा कारभार पाहण्यासाठी महिला असो की पुरुष या मताच्या पेटीतून राजा आणि राणी जन्मास येते म्हणून मतदान करणे हे अतिशय काळाची गरज आहे

नागरिकांनी ही मतदान देणे म्हणजे सर्वश्रेष्ठ दान देणे होय असल्यामुळे या देशाचा कारभार मतपेटीतून जन्मास आलेला राजा आणि राणी पाहतो आहे

या देशातील परंपरा कायम ठेवण्यासाठी अन्नदान करणे गरजेचे असून भुकेल्या माणसाला एका एका कनाच्या अन्नाची गरज असल्यामुळे अन्नदान करणारा अन्नदाता सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या देशातील जनता भुकेने याकूळ होऊ नये म्हणून अन्नदान करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे

अन्नदान रक्तदान मतदान या देशातील मोठे हे घटक असल्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान ही केले पाहिजे अन्नदात्यानी अन्नदान केले पाहिजे आणि मतदान करताना न चुकता मतदान करावे असे एन टी सरानी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे 



Post a Comment

0 Comments