भारतीय बौद्ध महासभा नायगांव तालुकास्तरीय बैठकीचे दिनांक १३ मे २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी भारतीय बौद्ध महासभा प्रदेश सचिव संबोधी सोनकांबळे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष पी.एम. वाघमारे संस्कार उपाध्यक्ष नरसिंग दरबारे संघटक हौसाजी वारघडे मुखेडचे तालुका अध्यक्ष गंगाधर सोंडारे अर्जुन चौंदन्ते यांच्या प्रमुख उपस्थित होते
यावेळी माजी अध्यक्ष गौतम जोंधळे सातेगावकर यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बरबडा जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्यां डॉ मीनाक्षी कागडे यांचे पतीराज डॉ शिवाजीराव कागडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
या बैठकीमध्ये धम्माचा प्रचार प्रसार नूतन कार्यकारणीची निवड व श्रामणेर शिबिराचे आयोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून याप्रसंगी जिल्ह्यातून उपस्थित असलेले विशेष मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व विचार व्यक्त केले
या बैठकीत भारतीय बौद्ध महासभा तालुका नायगांवच्या अध्यक्ष पदी समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. शिवाजी कागडे कुष्णूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी गायकवाड सूर्यकांत, दिलीप किशन गजभारे, सिद्धार्थ मारुती गजभारे, प्रदीप अशोकराव जोंधळे ,राजरत्न उमाकांत हणमंते ,दिलीप राजेंद्र बच्छाव, सोपान लक्ष्मण भेदे, गंगाधर विठ्ठलराव भेदे,आकाश गोविंदराव वाघमारे ,प्रकाशभाऊ निवृत्ती हणमंते, गोविंद हणमंते अंचोलीकर,गौतम केरबा धडेकर,रविकांत किशनराव हणमंते, गायकवाड काका बळेगांवकर आदी यावेळी उपस्थित होते
रविकुमार अशोक लांडगे कोलंबीकर,नागभूषण आनंदराव वाघमारे, निवृत्ती मालू रोडे, समता सैनिक दल भिमराव अंबाजी पवार, शशिकांत सोनसळे,संजय संभाजी गायकवाड, अमृत व्यंकटी पवार, महिला सैनिक वंदना अमृत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.नूतन अध्यक्ष डॉ. शिवाजी कागडे विचार व्यक्त करताना म्हणाले की, येणाऱ्या काळात नायगाव तालुक्याच्या प्रत्येक गावात धम्माचा प्रसार प्रसार करण्याची ,त्रिशरण पंचशील अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
गाव तिथे शाखा घर तिथे सैनिक राबविण्याचा संकल्प करून त्यांनी आपल्या विचारातून महत्वाची टिपणी व्यक्त केली जिल्हा कार्यकारणीचे व उपस्थितीत सर्वांचे आभार मानले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हौसाजी वारघडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश मेडिकल नायगांवचे रविकुमार अशोक लांडगे कोलंबीकर, सेंतु केंद्र प्रमुख प्रदिप जोंधळे लालवंडीकर गोविंद हणमंते अंचोलीकर यांनी परिश्रम घेतले

0 Comments