Header Ads Widget

काहाळा ते गडगा सोमठाणा येथे गती रोधक नसल्यामुळे वाहने मोकाट -सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार !!

        माधव पवार
सार्वजनिक बांधकाम विभागासह इंदोर कल्याण टोलनाक्याच्या बेजबाबदारपणामुळे नायगाव तालुक्यातील गडगा काहाळा सोमठाणा मार्गावर गतिरोधक केले नसल्यामुळे व वहानाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने या सदरच्या मार्गावर अनेक वाहने तुफानी वेगाने जात असल्याने या सदरच्या मार्गावर अपघाताचे हे प्रमाण वाढले आहे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक वेळा कंपनीला सूचना देऊन सुद्धा गतिरोधक बसविण्यात येत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे
नायगाव तालुक्यातील गाडगा काहाळा सोमठाणा मांजरम मार्गावर कुठेच गतिरोधक करण्यात आले नसल्याने सदरचे वाहने वाहन चालक मोकाट पद्धतीने चाललेल्याचे सदरच्या व्हिडिओ मध्ये दिसत येत असून अशा गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व इंदोर कल्याण टोलनाक्याच्या यंत्रेने तात्काळ लक्ष देऊन सदरच्या मार्गावर गतिरोधक केल्यास अपघाताचे प्रमाण वाढण्या ऐवजी कमी होतील अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असून अडचण नसून कोळंबा असल्या सारखे असल्याने जिकडे पाहावे तिकडे गतिरोधक नसल्याने सदरचे वाहने मोठे वेगाने धावत असल्याचे वास्तव चित्र गडगा काहाळा सोमठाणा मांजरम मार्गावर दिसून येत आहे

मांजरम सोमठाणा मांडणी काहाळा या संबंधित गावच्या सरपंचांनी सदरची बाब गांभीर्याने लक्ष देऊन जर सार्वजनिक बांधकाम विभाग व इंदोर कल्याण टोल नाक्याच्या यंत्रणेला अर्ज बाजारी केल्यास या गावांमध्ये गतिरोधक बसविण्यासाठी यंत्रणा राबेल असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
मौजे सोमठाणा येथे दीनानाथ मंगेशकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदरच्या महामार्ग लगत असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा जरी बंद असल्या तरी काही दिवसात शाळेचे वर्ग चालू करण्यासाठी केवळ एक महिना शिल्लक राहिला आहे

त्यापूर्वी जर या ठिकाणी गतिरोधक सरपंच उपसरपंच ग्रामसेवकानी ग्रामपंचायतचा ठराव दिल्यास गतिरोधक बसविण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 


Post a Comment

0 Comments