Header Ads Widget

गडगा येथील डॉ अरविंद जाधव यांची बदली करा अन्यथा जि. प. समोर अमरण उपोषण करण्याच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याना निवेदन !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम अंतर्गत असलेल्या गडगा येथील आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर अरविंद जाधव यांच्या कार्यप्रणालीवर जनतेसह रुग्णालयात रुग्ण नाराज असल्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी मांजरमच्या वैद्यकीय अधिकाऱ्याना रामदास भाकरे यांनी निवेदन देऊन कळविले आहे

गडगा येथील डॉ अरविंद जाधव यांची बदली करण्यात यावी अन्यथा जि. प. समोर अमरण उपोषण करण्याच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात इशारा देण्यात आला आहे

गडगा येथील आरोग्य उपकेंद्रातील डॉ अरविंद जाधव यांनी सतत गैरहजार राहत असल्यामुळे दवाखान्यात येणाऱ्या लोकांना वय वृद्ध महिलाना गरोदर मातांना तपासनी करण्यासाठी या ठिकाणी डॉ उपलब्ध राहत नसल्याचा ही सदरच्या दिलेल्या निवेदनात आरोप केले आहे

सदरच्या डॉक्टरची तात्काळ बदली करा अन्यथा नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे 



Post a Comment

0 Comments